बॉलिवूड अभिनेता सोहेल खान पुन्हा (mystery)एकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. IPL 2025 दरम्यान वानखेडे स्टेडियमबाहेर सोहेल खान एका तरुणीसोबत स्पॉट झाला असून, त्यांच्या एकत्र दिसण्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. घटस्फोटानंतर पहिल्यांदाच सोहेल खान एका ‘मिस्ट्री गर्ल’सोबत सार्वजनिक ठिकाणी दिसला आणि त्यामुळे चर्चांना नवा उधाण आला आहे.या फोटो-व्हिडीओमुळे अनेकांना प्रश्न पडला – ही तरुणी नक्की आहे कोण? या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल खानसोबत दिसणारी ही ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणजे ‘बिग बॉस’ फेम शेफाली बग्गा आहे. विशेष म्हणजे खुद्द शेफालीनेही सोहेलसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत, ज्यामुळे या नात्याबद्दलची चर्चा अधिकच गडद झाली आहे.

बिग बॉसमधून प्रसिद्धी मिळवलेली शेफाली बग्गा आता सोहेलच्या आयुष्यात? :
शेफाली बग्गा ही ‘बिग बॉस’ या सलमान खानच्या वादग्रस्त रिअॅलिटी शोची माजी स्पर्धक असून, या शोमुळे ती प्रकाशझोतात आली. शोमधील तिचा वावर, वक्तृत्व आणि आत्मविश्वास यामुळे तिला मोठ्या प्रमाणावर ओळख मिळाली. सोशल मीडियावरही शेफाली मोठ्या प्रमाणावर (mystery)सक्रिय असून तिच्या चाहत्यांची संख्याही लक्षणीय आहे.
सोहेल आणि शेफालीसोबतचे फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने विचारले – “सोहेल खान आता हिला डेट करतोय का?” तर दुसरा म्हणाला – “शेफाली, तू याच्यासोबत काय करते आहेस?” मात्र, यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप neither सोहेल खान कडून nor शेफाली बग्गा कडून आलेली नाही.
सलमान खानसोबत असलेलं खास नातं बनलं चर्चेचा मुद्दा :
शेफाली बग्गा आणि सलमान खान यांचं एक खास कनेक्शनही चर्चेत आहे. बिग बॉसच्या माध्यमातून या दोघांत स्नेहाचे नाते निर्माण झाले होते. यामुळेच शेफाली(mystery) आणि सोहेल यांच्यातील ही जवळीक आणखी चर्चेचा विषय बनली आहे. सलमान खानकडून या दोघांच्या नात्याबाबत काही प्रतिक्रिया येणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.सोहेल खानचा घटस्फोट 2022 मध्ये झाला होता. त्यानंतर तो वैयक्तिक आयुष्यापासून दूर राहत असल्याचं दिसत होतं. मात्र आता शेफाली बग्गासोबत दिसल्याने त्याच्या आयुष्यात एक नवीन फेज सुरू झाला का? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
हेही वाचा :
सुळकुड योजनेच्या अंमलबजावणीसाठी इचलकरंजी नागरिक मंच आक्रमक,आयुक्तांना आग्रही राहण्याचे निवेदन.
आज अनेक शुभ संयोग; ‘या’ 5 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, उत्पन्नाचे मार्ग मोकळे होणार
झापुक झुपूक सुरज आणि किंग कोहली आले समोरासमोर, Video Viral