कोण म्हणतय “व्यवस्थे” समोर सर्वजण समान आहेत?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कायद्यासमोर कोणी मोठा नाही तर कोणी छोटा नाही, सर्व समान आहेत. शासन व्यवस्थेमध्ये (system) सर्वांना समान न्याय, सर्वांना सारखेच महत्त्व आहे. ही वाक्य वाक्ये बोलायला सोपी आणि ऐकायला भलतीच गोड वाटतात. प्रत्यक्षात मात्र तसे घडताना दिसत नाही. तसे असते तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी कृष्णा आंधळे हा केव्हाच पोलीस कोठडीत आला असता.

त्याला अटक करण्यासाठी पोलीस प्रशासनाने(system) आकाश पाताळ एक केले असते पण इथे एका माझी मंत्री व विद्यमान आमदाराच्या तरुण मुलाच्या शोधासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंतची शासन यंत्रणा गतिमान केली जाते आणि आकाशात उडणाऱ्या विमानाला तातडीने माघारी वळायला आणि इथल्या विमानतळावर लँड व्हायला भाग पाडले जाते. आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी व संबंधित तरुणाचा माझी मंत्री असलेला बाप हे दोघे संयुक्त पत्रकार परिषदेत घेऊन घटना पट मीडियासमोर उलगडतात.

माझी आरोग्य मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा तरुण मुलगा ऋषीराज घरातून अचानक निघून जातो. आणि त्याच्या मोबाईलवरून तो कोठे आहे याचा ट्रेस लागत नाही. घरचे लोक काळजीत पडतात. आपल्या मुलाचे अपहरण झाले आहे असे घरच्यांना वाटते. प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत जातं. फिर्याद्री दाखल होते. मुलगा उशिरा आज याच्या जीवाचे बरे वाईट होईल अशी भीती व्यक्त केली जाते आणि हे प्रकरण उच्च पदस्थ वर्तुळातील असल्याने आपल्याच घरच्या मुलाचे अपहरण झाले आहे असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना वाटते. मग पोलिसांच्या हालचाली विलक्षण गतिमान होतात.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्याची गांभीर्याने दखल घेतली जाते. ऋषिराज सावंत हा खाजगी चार्ट विमानातून एका मित्रासमवेत बँकांच्या दिशेने जात असल्याचे समजते मग थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधला जातो. विमान उड्डाण मंत्रालयास साकडे घातले जाते(system). आणि मग अरबी समुद्रावरून बँकॉकच्या दिशेने निघालेले चाप्टर विमान मागे वळवण्यास भाग पाडले जाते. ऋषीराज सावंत त्याच्या घरी पोहोचतो.

आता या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ऋषीराज सावंत याचे अपहरण झालेले नसताना, जणू काही खंडणीसाठी त्याचे अपहरणच झाले आहे असे वातावरण कोणी निर्माण केले? तानाजी सावंत किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी तशी थेट फिर्याद दिली होती काय? अपहरणच झाले आहे हे कसे गृहीत धरले गेले? खंडणीसाठी सावंत यांच्याशी कोणी संपर्क साधला होता काय? आपल्या मुलाचे अपहरणच झाले आहे असे सांगितल्याशिवाय तपास यंत्रणा गतिमान होणार नाही म्हणून खोटेच सांगितले आहे काय?

मुंबईपासून दिल्लीपर्यंतची शासन यंत्रणा वेठीस धरल्याबद्दल तानाजी सावंत यांच्यावर काय कारवाई केली जाणार? खोटी फिर्याद देणाऱ्यावर काय कारवाई केली जाते? हवेतले हे प्रकरण जमिनीवर आल्यानंतर पोलीस प्रमुख आणि कठीत फिर्यादी हे संयुक्तपणे मध्यमंना सामोरे जाऊ शकतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात पण त्याची उत्तरे कधीही दिली जाणार नाही हेही तितकेच खरे आहे.

‌ ऋषीराज तानाजी सावंत हा आठ दिवसापूर्वीच दुबईला जाऊन परत येतो. त्यानंतर 18 आसन क्षमतेचे खाजगी चार्टर विमान भाड्याने घेऊन तो एका मित्रासह बँकॉकला रवाना होतो. या चार्टर विमानाचे भाडे 64 लाख रुपये इतके होते. अशी माहिती पुढे आली आहे. इतका प्रचंड पैसा या आमदार पुत्राकडे कसा आला हा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे. सावंत कुटुंबीयांत काय कलह होता याचा या इथे विचार करण्याची गरज नाही.

कारण तो त्यांचा व्यक्तिगत खाजगी प्रश्न आहे(system). प्रश्न इतकाच आहे की न झालेल्या अपहरण गुन्ह्यासाठी विद्युत गतीने यंत्रणा हलते. एखाद्या सामान्य कुटुंबात असे काही घडले असते तर त्याची दखल फार फार तर पोलीस हवालदारांने घेतली असती. यापूर्वी काही श्रीमंत कुटुंबातील मुलांचे अपहरण खंडणीसाठी केले गेले होते आणि त्याचा तपास गतिमान यंत्रणेने केलेला नव्हता किंवा तपास सुरू असताना संबंधित मुलाचा किंवा तरुणाचा मृतदेह सापडलेला होता.

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोग या गावचे तरुण सरपंच संतोष देशमुख यांचे वडील मंत्री किंवा खासदार, आमदार असते तर त्यांची हत्या करण्याचे धाडस कुणी केले नसते आणि हत्याच झाली असती तर गुन्हेगारांच्या मुसक्या तातडीने आवळल्या गेल्या असत्या. इथे”व्हिक्टिम” कोण आहे, यावर तपास यंत्रणा काम करत असते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे हा घटना होऊन तब्बल दोन महिने झाल्यानंतरही पोलिसांना सापडत नाही.

सोमनाथ सूर्यवंशी याचा तो कायदेशीर कोठडीत असताना त्याचा मृत्यू होतो. लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात आणि मग सावकाश काही पोलिसांना निलंबित केले जाते. एफ आय आर कोणी नोंदवली आणि व्हिक्टीम कोण आहे याचा विचार करून तपास यंत्रणा काम करत असेल तर इथल्या प्रस्थापित “व्यवस्थे” समोर प्रचलित कायद्यासमोर सर्वजण समान आहेत असे म्हणता येईल काय?

हेही वाचा :

यालाच तर सारे म्हणतात शरद पवारांचं राजकारण!

अपघातानंतर ‘या’ अभिनेत्रीने घेतला सर्वात मोठा निर्णय!

स्नेह : व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रदर्शित होणार मराठी संगीत विश्वातील पहिलंच रोमँटिक इंस्ट्रुमेंटल गाणं