राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. या सरकारचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहतील. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली सही गरजू रुग्णाला आर्थिक मदत देण्यासाठी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर फडणवीस यांनी पहिली-वहिली मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी राज्याच्या (post)गृहमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.
आम्हा तिन्ही पक्षांना जास्तीत जास्त (post)मंत्रिपदं मिळावीत असं वाटतं. जेव्हा एखाद पक्ष चालवायचा असतो तेव्हा नेत्यांना संतुष्ट करावं लागतं. त्यामुळे खातेवाटपावर आमची चर्चा चालू आहे. आमची ही चर्चा आता जवळ-जवळ संपत आली आहे. आमचं मंत्रिपदांचं वाटप जवळजवळ पूर्ण झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे. त्यामुळे 16 डिसेंबरच्या अगोदरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. गृहमंत्रिपदाबाबत आमची चर्चा चालू होती. मात्र या पदावरून आमच्यात ओढाताण वगैरे होतेय, असं काहीही नाही, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
गृहखातं, महसूल या खात्यांना थोडं महत्त्व असतं. आमच्या महायुतीत तीन पक्ष आहेत. या तिन्ही पक्षांचा योग्य तो सन्मान देण्यात आला आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. तसेच गृहखातं तुमच्याकडेच असेल का? या प्रश्नावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्मीतहास्य केलं आणि याबाबत जेव्हा निर्णय होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन, असं उत्तर दिलं.
दरम्यान, राज्यात आता सरकारची स्थापना झाल्यानंतर कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदं येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील आमदार मंत्रिपदासाठी लॉबिंग करत असल्याचं दिसतंय. त्यामुळे तसेच कोणत्या नेत्याची वर्णी मंत्रिपदी लागणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
“शपथविधीच्या आठवणीने फडणवीसांचे ठाकरे-पवारांना जोरदार प्रत्युत्तर”
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द रूल’ चित्रपटानं मोडले ‘जवान’ आणि ‘अॅनिमल’चे रेकॉर्ड
धार्मिकतेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष, तडफडून झाला मृत्यू