संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेचा आज निकाल(delhi) लागणार आहे. दिल्ली कोणाची यासाठी 5 फेब्रुवारीला मतदान झालं. आता सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी कांटे की टक्कर झालीय. अरविंद केजरीवाल यांची आप हॅटट्रीक साधणार की भाजप आपचा वारू रोखणार असा सवाल दिल्लीकरांसह संपूर्ण देशाला पडला आहे.
दिल्ली काबीज करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडलंय. केजरीवाल यांच्यासह दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनीही सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केलीय. (delhi)एक्झिट पोलचा अंदाज पाहता भाजप सत्तेत येईल असा कयास आहे. मात्र दिल्लीकरांनी कोणाला कौल दिलाय हे प्रत्यक्ष मतमोजणीतच समजेल. आठ वाजता आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल, त्यानंतर ईव्हीएमची मोजणी होईल. दरम्यान, दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच त्यांनी निकालाआधी लक्ष्मी नारायण मंदिरात पूजा देखील केली.
दिल्लीतील महत्वाची (delhi)लढत-
नवी दिल्ली विधानसभा-
अरविंद केजरीवाल आप
संदीप दीक्षित काँग्रेस
प्रवेश वर्मा भाजप
कालकाजी मतदारसंघ-
आतिशी आप
अलका लांबा काँग्रेस
रमेश बिधूडी भाजप
जंगपुरा मतदारसंघ-
मनीष सिसोदिया आप
फरहाद सूरी काँग्रेस
तरविंदर सिंह मारवा भाजप
पटपडगंज मतदारसंघ-
अवध ओझा आप
अनिलकुमार चौधरी काँग्रेस
रवींद्रसिंह नेगी भाजप
एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज-
चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजप- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेसला – 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजप – 42-50
AAP – 18-25
कांग्रेस – 0-2
मतांची टक्केवारी कशी?
भाजप – 45 %
AAP – 42 %
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजप – 40-44 जागा
आप – 25-29 जागा
काँग्रेस – 0-1 जागा
P-Marq Exit Poll : पी मार्क एक्झिट पोल
भाजप – 39-49
AAP – 21-31
कांग्रेस – 0-1
WeePreside Exit Poll : वी प्रीसाईड एक्झिट पोल
भाजप – 46-52
AAP – 18-23
कांग्रेस – 0-1
मतांची टक्केवारी कशी?
भाजप – 49.2 %
AAP – 42.8 %
कांग्रेस – 5.1 %
हेही वाचा :
थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?
मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas
हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?