डॉक्टरांचं अक्षर का वाचता येत नाही? जाणून घ्या यामागचं शास्त्रीय कारण

सर्दी ताप असो किंवा मग आणखी काही शारीरिक व्याधी, अशा वेळी एकमेव व्ययक्ती आपल्याला आठवते आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. आरोग्यविषयक कैक शंका आणि मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं देत, ‘तुम्हाला काही झालेलं नाही… तुम्ही अगदी व्यवस्थित आहात’ अशी हमी देणारे हेच ते(Doctor) डॉक्टर.

हीच डॉक्टर(Doctor) मंडळी जेव्हा एखाद्या रुग्णाला त्याच्या आजारपणावर एखादं औषध घेण्याचा सल्ला जेव्हा देतात तेव्हा ते एका कागदावर औषधांची नावं लिहितात. औषक नेमकं कधी आणि कितीवेळा घ्यायचं हेसुद्धा त्यांनी या कागदावर नमूद केलेलं असतं. मात्र त्यांनी म्हणजेच डॉक्टरांनी नेमकं काय लिहिलं आहे हे मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही.

कारण असतं ते म्हणजे या तज्ज्ञ मंडळींचं न उमगणारं हस्ताक्षर. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी वाचताना भल्याभल्यांना घाम फुटतो. डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी वाचणं सहजासहजी शक्यच होत नाही. मुळात डॉक्टरांचं हे अक्षर कोणालाच न कळणं असं नेमकं का होतं? यामागेही आहेत काही महत्त्वाची कारणं.

डॉक्टरांना एकाच वेळी अनेक रुग्णांची विचारपूस करायची असते. ज्यामुळं अतिघाईमुळं त्यांचं लिखाण बिघडतं. सतत लिहून त्यांच्या हाताच्या मांसपेशींना थकवा येतो आणि त्यामुळंच डॉक्टरांचं अक्षर ओघाओघानं बिघडत जातं आणि इतकं बिघडतं की ते अगदी सामान्यांच्या समजण्यापलिकडे असतं.

आणखी एक कारण म्हणजे काही वैद्यकिय शब्द इतके मोठे आणि क्लिष्ठ असतात की त्यांचं स्पेलिंग कित्येकांच्या लक्षात राहत नाही. ज्यामुळं अनेकदा स्पेलिंगमध्ये चुका होतात किंवा डॉक्टर ती थोडक्यात लिहितात. डॉक्टर खरंतर चिठ्ठीवर औषधांची संपूर्ण नावं न लिहिता त्यांचा कोड लिहितात. मेडिकलमध्ये काम करणाऱ्यांना हा कोड लगेचच लक्षात येतो. त्यामुळं इथून पुढे असं अक्षर दिसल्यास गोंधळून जाण्यापेक्षा हे अक्षर नेमकं असं का आहे हे लक्षात घ्या.

हेही वाचा :

एक हिट चित्रपट देऊन ‘हा’ मुलगा रातोरात झाला स्टार

आज सोन्याचे दर वाढले, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा 24 कॅरेटचे दर

विनोद कांबळीसाठी एकनाथ शिंदेंनी पुढे केला मदतीचा हात