कोल्हापूर: आज आषाढी एकादशीच्या विशेष लेखात, श्री विठ्ठलांच्या पंढरपुरातील(avatar) प्रकटनाबद्दल चर्चा करत आहोत. भगवान विष्णूंचे २४ अवतारांपैकी १० प्रमुख अवतार आहेत, ज्यापैकी एक आहे श्री विठ्ठलांचा अवतार. भगवान विठ्ठलांनी पंढरपुरातील निवड का केली, याबद्दल ‘पांडुरंगमाहात्म्या’त काही कारणं सांगितली आहेत.
स्कंद ‘पांडुरंगमाहात्म्या’त श्रीविठ्ठलाच्या प्रकटनाची ही घटना जशी(avatar) नोंदविली आहे. ‘पांडुरंगमाहात्म्या’त विठ्ठलाचे चरित्र ग्रथित झाले आहे.
पहिलं कारण – दिंडीर वन
डिंडीरव (दिंडीर) वनात मातलेल्या डिंडीरव नामक दैत्याचा वध करण्यासाठी विष्णूने मल्लिकार्जुन शिवाचे रूप धारण केले आणि लोहदंडाने त्या दैत्याचा वध केला.
दुसरं कारण – रूसलेल्या रुक्मिणीला मनवण्यासाठी
कृष्णाने द्वारकेतही राधेला जवळीक दिल्यामुळे त्याच्यावर रुसून भीमेच्या काठी दिंडीरवनात येऊन राहिलेल्या रुक्मिणीचा रुसवा काढण्यासाठी कृष्ण गाई- गोपाळांसह प्रथम गोपाळपूर या ठिकाणी आला आणि तेथे सर्व परिवार ठेवून एकटाच गोपवेषाने रूक्मिणीकडे गेला.
तिसरं कारण – भक्त पुंडलिकासाठी
भक्त पुंडलिकासाठी उभा राहिली विठेवरी, अशी वाक्य तुम्ही ओव्यांमध्ये, विठ्ठलाच्या गाण्यांमध्ये ऐकली असतील. त्याच प्रमाणे, भक्त पुंडलिकाच्या मातृ-पितृ सेवेवर प्रसन्न होऊन आशिर्वाद दिले. पुंडरिकाच्या (पुंडलिकाच्या) मातृपितृसेवेने संतुष्ट होऊन त्याच्या आश्रमात कृष्ण गोपवेषाने त्याला दर्शन देण्यासाठी आला.
चौथे कारण – एका गोपीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन
पद्मा नामक एका रूपसुंदर युवतीने इष्टवरप्राप्तीसाठी तप आरंभिले असता देव तिच्याहूनही सुंदर रूप धारण करून तिच्यासमोर प्रकट झाला. स्कांद माहात्म्या- नुसार ही एक अनाम गोपी होती; तर पाद्य माहात्म्यानुसार ती चंद्रसेन राजाची कन्या होती. देवाच्या वरप्रदानामुळे तिच्च्या नावाने ‘मुक्तकेशी’ तीर्थ निर्माण झाले.
सर्व वारकरी चालत पंढरपुरात पोहोचले आहेत आणि विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी वारीत सहभागी झाले आहेत. श्री विठ्ठलांच्या या महत्त्वपूर्ण कारणांमुळे पंढरपुराला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :
मलायका अरोराने नियॉन बिकीनीत ‘चाहत्यांना केले घायाळ
विशाळगड प्रकरणात सतेज पाटील आक्रमक, थेट ‘एसपी’ची बदली करण्याची केली मागणी
‘रोहित शर्मानंतर….’ गौतम गंभीरच्या एका मतावर ठरणार भारतीय संघाचं भवितव्य