१६ जानेवारीला इंटरनेट बंद का झालं नाही?’ द सिम्पसन्सच्या भविष्यवाणीवर मजेशीर मीम्स व्हायरल

आजच्या तारखेला आपण (internet)इंटरनेटशिवाय राहू शकत नाही. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण इंटरनेटच्या सानिध्यात असतो.

काही जणांचा तर रोजगारच(internet) इंटरनेटवर आधारीत आहे. असो, पण याच पार्श्वभूमीवर गेला महिनाभर एक बातमी व्हायरल होत होती. ‘१६ जानेवारी रोजी संपूर्ण जगाचं इंटरनेट बंद होणार’ असा खळबळजनक दावा या बातमीमध्ये करण्यात आला होता.

खरं तर एक ‘द सिम्पसंस’ नावाचं एक कार्टून आहे. या कार्टूनमध्ये १६ जानेवारी रोजी इंटरनेट बंद होणार असा एक भाग दाखवण्यात आला होता. यावरून ही बातमी व्हायरल झाली आणि जो तो १६ जानेवारी रोजी काय घडणार ही चर्चा करू लागला. पण वास्तविक तसं काहीच झालं नाही.

१६ जानेवारीला इंटरनेट नेहमी प्रमाणेच सुरू राहिलं. आता एवढी मोठी घटना घडलीये तर मीमसेना कशी शांत राहिल? तर या १६ जानेवारीच्या प्रकरणावर आता मजेशीर मीम्स व्हायरल होत आहेत. अन् हे मीम्स पाहून खरंच तुम्हाला हसू आवरणार नाही.

हेही वाचा :

‘या’ 5 राशींवर असणार बाप्पाचा आशीर्वाद, उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार

सोन्याच्या किमतीत उसळी: आजच्या तोळ्याची किंमत जाणून घ्या

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, नंतर रचला पती बेपत्ता झाल्याचा बनाव