हिंदू धर्म हा जगातल्या प्रमुख धर्मांपैकी एक आहे. या धर्मातल्या (festival)प्रत्येक प्रथेला आणि प्रत्येक सणाला स्वत:चं असं वेगळं महत्त्व आहे. इतर धर्मांच्या तुलनेत या धर्मातले लग्नविधीदेखील वेगळे आणि विशेष मानल्या जातात. भारतात हिंदू धर्मानुसार होणाऱ्या लग्नसोहळ्यांमध्ये अनेक विधी असतात. लग्नानंतर पहिल्या रात्री म्हणजेच मधुचंद्राच्या रात्री पतीला दुधाचा ग्लास देण्याच्या प्रथेचादेखील यामध्ये समावेश होतो. अनेक जण ही प्रथा पाळतात; पण त्यांना त्यामागचं कारण माहिती नसतं. त्याविषयी जाणून घेऊया
अनेक बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये दाखवलं जातं, की लग्नानंतर लगेचच येणारा हनिमून वधू-वरांसाठी खूप विशेष असतो. कारण, लग्नानंतर पती-पत्नी आपलं वैवाहिक जीवन सुरू करणार असतात. चित्रपट आणि मालिकांमध्ये असं दाखवलं जातं, की लग्नाच्या (festival)पहिल्या रात्री पत्नी आपल्या पतीला हळद किंवा केशर घातलेलं दूध देते.
लग्नानंतर पतीला दुधाचा ग्लास देण्याची ही प्रथा कशी सुरू झाली आणि त्यामागे काय कारण आहे, असा प्रश्न कधी ना कधी पडला असेल. केशर असलेलं दूध पिण्याचा उल्लेख कामसूत्रात आहे. त्यामुळे शारीरिक शक्ती वाढते असं म्हणतात. ही प्रथा आता हळूहळू नाहीशी होत आहे. प्रत्येक विवाहित जोडप्याने चित्रपट आणि मालिकांमध्ये जे दाखवलं जातं ते आपल्या आयुष्यात केलंच पाहिजे, ही विचारसरणी मागे पडत आहे.
सामान्यपणे अनेकांना रात्री दूध पिऊन झोपायला आवडतं. कारण, दूध पिणं शरीरासाठी उपयुक्त असतं. लग्नानंतरची पहिली रात्र ही पती-पत्नीच्या वैवाहिक आयुष्याची सुरुवात असते.वैवाहिक आयुष्याची सुरुवात चांगली व्हावी यासाठी दुधात साखर, हळद आणि केशर मिसळून दिलं जातं. (festival)त्यामुळे पती-पत्नीचं नातं दृढ राहतं. याशिवाय, दूध हे पवित्र पेय मानलं जातं, तर केशर हे कामोत्तेजक आहे. यामुळे लैंगिक इच्छा वाढते. दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचं अमिनो अॅसिड असतं. हा घटक शरीराच्या वाढीसाठी आणि प्रोटीनचं संतुलन राखण्यास मदत करतो. या कारणांमुळेदेखील लग्नानंतर पहिल्या रात्री पुरुषांना दूध दिलं जातं. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांनी नेहमी दुधाचं सेवन केलं पाहिजे.
हेही वाचा :
शरद पवार गट कोल्हापूर जिल्ह्यातील या सहा जागा लढवणार
धरणक्षेत्रात अतिवृष्टीची पुनरावृत्ती; पंचगंगेच्या पाणीपातळीच्या वाढीचा इशारा
नवऱ्याला सोडून ऐश्वर्या राय परदेशात रवाना समोर आलेला फोटो थक्क करणारा
मुलासाठी हार्दिक पांड्या भावूक वाढदिवशी लिहिली खास पोस्ट
अर्जुन बिजलानीचा गोव्यात अपघात, जखमी अवस्थेतील फोटो समोर