योग्य वयात जीमला जाणे का महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य वय

बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्तीला प्राधान्य देणे आवश्यक झाले आहे, आणि जीमला (gym)जाण्याची क्रेझही वाढली आहे. मात्र, अनेकजण योग्य वयाचा विचार न करता लहान वयातच जीमला जाऊ लागतात, ज्याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, जीममध्ये जाण्यासाठी योग्य वय १६ ते १८ वर्षांचे असावे. या वयात शरीराचा शारीरिक विकास पूर्ण होत असतो आणि व्यायामामुळे शरीर मजबूत होण्यास मदत होते. योग्य वयात जीमला जाण्याचे अनेक फायदे आहेत, ज्यात मसल्स बिल्डिंग, हाडांची ताकद वाढवणे, वजन नियंत्रित ठेवणे आणि मानसिक आरोग्य सुधारणे यांचा समावेश होतो.

लहान वयात जीमला जाण्याचे टाळावे, कारण शरीराचे पूर्णतः विकास न झाल्याने हाडे आणि स्नायूंवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोका निर्माण होतो.

हेही वाचा:

कर्करोगावरील औषधं स्वस्त, फरसाणाच्या दरात घट; जीएसटी परिषदेच्या ५४ व्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय

“इचलकरंजीत पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचे आवाहन”

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक सल्ला: “पक्षाचं नाव शरद पवारांना द्या”