“वहिनी का चिडल्या?”; भारतविरुद्ध पाक सामन्यादरम्यानचा अनुष्काचा व्हिडीओ Viral

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा ही अनेक वेळा टीम इंडियाला(match) सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट सामन्यांमध्ये हजेरी लावत असते. 9 जून रोजी इंडियाविरुद्ध पाकिस्तान टी20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅच न्यूयॉर्कमध्ये पार पडली. या सामन्यामध्ये भारताचा विजय झाला. हा सामना पाहण्यासाठी देखील अनुष्का स्टेडियममध्ये हजर होती. अशातच आता आता स्टेडियममधील अनुष्काचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सोशल मीडियावरील(match)व्हिडीओमध्ये अनुष्का ही एका व्यक्तीसोबत बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्काचे चेहऱ्यावरील हावभाव हे गंभीर दिसत आहेत. अनुष्का ही चिडून बोलत आहे, असा अंदाज सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी लावत आहेत.

अनुष्काच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर एका नेटकऱ्यानं कमेंट केली,”वहिनी का चिडल्या आहेत?” तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, “आपला भाऊ चार धावांनंतर आऊट झाला म्हणून वहिनी चिडल्या असतील”

युझवेंद्र चहलची पत्नी धनश्रीनं इंडियाविरुद्ध पाकिस्तान टी20 क्रिकेट वर्ल्ड कप मॅचदरम्यानचा एक ग्रुप फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह आणि विराटची पत्नी अनुष्का या दोघी दिसत होत्या.

अनुष्का ही आता क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या आयुष्यावर आधारित असणाऱ्या ‘चकदा एक्सप्रेस’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामुळे ती सहा वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. अनुष्काच्या या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

हेही वाचा :

राजकारणातले “आत्मा”राम

ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान अर्जुन-मलायकामध्ये ‘पोस्ट वॉर’

ग्राहकांना मोठा धक्का! एटीएममधून पैसे काढणे होणार महाग