सोशल मीडिया दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी चित्र-विचित्र तर कधी मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी लहानांपासून ते मोठ्या पर्यंत सगळेच व्हिडिओ बनवत असतात. डान्स, स्टंट(Stunt), जुगाड, यांसारखे अनेक अंगावर काटा आणणारे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. अनेकदा काही लोकांना स्टंट, खोडसळपणा चांगलाच अंगाशी येतो.
सध्या असाच एक तरुणाचा स्टंट व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. या तरुणाने असा काही स्टंट केला आहे की, यामुळे अनेकांनी त्याचे हसू केले आहे. या तरुणाने तोंडाला ग्लू लावला असून पुढे जे घडले ते पाहून अनेकांना हसू फुटले आहे. हा व्हिडिओ सध्या प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण दिसत आहे. तो सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी भलत्याच स्टंट(Stunt) करुन व्हिडिओ बनवत आहे. त्याचा हा स्टंट चांगलालाच अंगलट आला आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणाने एक ग्लू घेतला असून तो ओठांना लावतो. नंतर तो ओठ बंद करतो.
काही वेळाने तो बोलण्यासाठी तोंड उघडण्याचा प्रयत्न करतो पण ग्लू मुळे तोंड उघडले जात नाही. व्हिडिओत तुम्ही ऐकू शकता की, त्याच्या आसपास काही लोक आहे जे त्याच्यावर हसत आहे. तो देखील हसत आहे. पण आपले तोंड उघडत नाही लक्षात येताच काही वेळातच तरुण रडायला येते. सध्या हा व्हिडिओ नेकऱ्यांच्या हसण्याचे कारण बनला आहे.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @badis_tv या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे. एका युजरने म्हटले आहे की, नको ती मस्ती कशीला करायची. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, प्रत्येकाने एकदा ट्राय करा. तर काहींना यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून संपूर्ण इंटनेटवर हशा पिकला आहे.
हेही वाचा :
टक्कल पडणे, गंभीर प्रश्न उत्तराच्या शोधात टक्कल ग्रस्त
मोठी बातमी ! ठाकरे गटाला मिळणार विरोधी पक्षनेतेपद; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय
अंगावर काटा येईल असा आहे ‘छावा’चा जबरदस्त ट्रेलर; दोन तासांत मिळाले १५ लाख व्ह्यूज!