हार्दिक पंड्यावर क्रिकेट फॅन्सचा संताप का? रोहितची कॅप्टनसी नव्हे, तर ही आहेत कारणं

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स(cricket) संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. संघाची जबाबदारी मिळाल्यापासून मुंबई इंडियन्सने सलग ३ सामने गमावले आहेत. जेव्हापासून रोहितला कर्णधारपदावरून काढून हार्दिक पंड्याला संघाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तेव्हापासूनच त्याला जोरदार ट्रोल केलं जात आहे. मात्र हेच एकमेव कारण आहे का? तर नाही. आणखी काही कारणं आहेत ज्यामुळे क्रिकेट(cricket) फॅन्स हार्दिक पंड्याला टार्गेट करत आहेत. कोणती आहेत ती कारणं? जाणून घ्या.

तिलक वर्माचं अर्धशतक..
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील टी -२० मालिकेदरम्यान धावांचा पाठलाग करत असताना तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली होती. त्यावेळी तो ४९ धावांवर फलंदाजी करत होता. त्याला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र हार्दिक पंड्याने षटकार मारून सामना जिंकवला. मात्र त्याचं अर्धशतक राहून गेलं हार्दिकने हे मुद्दाम केलं, असं अनेकांचं म्हणणं होतं.

केएल राहुलचं शतक..
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील सामन्यात केएल राहुल ९७ धावांवर फलंदाजी करत होता. त्यावेळी त्याला शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याचवेळी हार्दिकला षटकार मारून हिरो बनायचं होतं. त्याने षटकार मारला आणि सामना जिंकला. मात्र राहुलचं शतक राहून गेलं.

रोहित शर्माला पळवणं..
हार्दिक पंड्या जेव्हा पहिल्यांदाच कर्णधार म्हणून मैदानात उतरला त्यावेळी नेतृत्वात तर चुका केल्याच. यासह माजी कर्णधार रोहित शर्मासोबत गैरवर्तणूक करताना दिसून आला. तो क्षेत्ररक्षण सजवताना रोहितला इकडून तिकडे पळवताना दिसून आला.

लसिथ मलिंगाला धक्का मारणं..
हार्दिक पंड्याचा आणखी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता ज्यात तो लसिथ मलिंगाला धक्का मारताना दिसून आला. ज्यावेळी लसिथ मलिंगा त्याला मिठी करण्यासाठी आला त्यावेळी हार्दिक पंड्याने त्याला धक्का मारला.

हेही वाचा :

‘अचानक मुंबईचा कर्णधार बदलला जाऊ शकतो, मी संघ मालकांना जितका ओळखतो; ते..’

ब्रिजभूषण सिंहचा १८ एप्रिलला काय होणार फैसला? कोर्टानं राखून ठेवला निर्णय

“हातकणंगलेत ‘मशाल’ दिलीय, मग सांगलीत हट्ट कशासाठी?” कदमांनी ठाकरेंना डिवचले