पत्नी हॉस्पिटलमध्ये.. बिल भरायला पैसे नव्हते; व्यक्तीला चिमुकल्या बाळाला विकायला लावले

लखनऊ- उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली पत्नी आणि नवजात बाळाला हॉस्पिटलमधून(hospital) डिस्चार्ज मिळवण्यासाठी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला विकण्याला भाग पाडण्यात आले आहे. वडिलाकडे हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते, त्यामुळे नाईलाजाने त्याला आपल्या मुलाला विकावे लागले आहे.

सदर घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई केली असून आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात मुलाला विकत घेणाऱ्या दाम्पत्याचा देखील समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हरिश पटेल हे बर्वा पट्ट्टीचे रहिवासी आहेत. हरिश यांच्या पत्नीची डिलिव्हरी होणारी होती. त्यामुळे तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

हरिश पटेल हा लगेच पैसे देण्याच्या आर्थिक स्थितीत नव्हता. हॉस्पिटल(hospital) स्टाफ पैसे न भरता त्याची पत्नी आणि त्याच्या नव्याने जन्मलेल्या मुलाला सोडण्यास तयार नव्हते. स्टाफ कर्मचाऱ्यांनी त्याला त्याच्या एका मुलाला विकण्याचा सल्ला दिला. अशा स्थितीत नाईलाजाने हरिश पटेल याने आपल्या चिमुकल्याला विकण्याचा निर्णय घेतला. हरिश याला एकूण सहा मुलं आहेत. तो मजुरीचे काम करतो.

पैशाची सोय होत नसल्याने त्याने आपल्या मुलाला काही हजार रुपयांसाठी विकण्याचा निर्णय घेतला. यात एक व्यक्तीने मध्यस्थी केली होती. त्याच्या माध्यमातून हे बाळ एका दाम्पत्याला विकण्यात आले. पोलिसांना यासंदर्भातील माहिती मिळताच त्यांनी तपास सुरु केला होता.

पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी करणारा व्यक्ती अमरेश यादव, दाम्पत्य भोला यादव आणि कलावती, एक फेक डॉक्टर, तारा कुशवाह आणि सुगंती हॉस्पिटलमधील एका सफाई कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. याशिवाय, याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्यास कमी पडलेल्या पोलीस कॉन्स्टेबलवर देखील कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षाच्या मुलाला सुखरुपपणे त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले आहे.

हेही वाचा:

गणपती बाप्पाला ‘या’ राशीचे लोक फार प्रिय असतात!

‘तू Hot दिसतेस, माझ्याबरोबर…’; अश्लील फोटो पाठवत अभिनेत्रीकडे मागणी!

आर. आर. आबांच्या लेकाविरोधात खासदार विशाल पाटील बंडाळी करणार?