भुजबळांच्या नाराजीवर अजितदादा मोठा निर्णय घेणार?

महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारावरून अनेक आमदार (latest politicaal news)नाराज असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्या मनातील नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. कारण छगन भुजबळ यांना अजित पवार गटाकडून मंत्रिपद मिळालं नाही.

यासंदर्भात छगन भुजबळ(latest politicaal news) यांनी येवल्यात आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आहे. यावेळी बैठकीदरम्यान त्यांनी अनेक गोष्टींचा गौप्य्स्फोट केला आहे. तसेच मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.त्यानंतर नागपुरात सुरु असलेलं हिवाळी अधिवेशन सोडून छगन भुजबळ नाशिकला गेले.

दरम्यान, छगन भुजबळांच्या या नाराजीनंतर आता त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु झाल्या आहेत. कारण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे छगन भुजबळ यांची भेट घेणार असल्याचं बोललं जात आहे.

याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लवकरच आमदार छगन भुजबळांची भेट घेणार आहेत. मात्र त्यांच्या भेटीची तारीख अद्याप ठरली नाही. परंतु, हे तिन्ही नेते नाशिकमध्ये जाऊन भेट घेण्याची दाट शक्यता वारवण्यात आली आहे. त्यामुळे आमदार छगन भुजबळांची नाराजी दूर करण्यात अजित पवारांना यश येणार का? याकडे अवघ्या महाराष्टाच लक्ष लागलं आहे.

आमदार छगन भुजबळ हे सध्या राज्यातील प्रमुख ओबीसी नेते आहेत. मात्र ते लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तसेच आमदार छगन भुजबळ हे आत्ताच्या घडीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेता आहेत. तसेच त्यांच्यासारखा मोठा चेहरा गमावणे हे देखी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला परवडण्यासारखे नाही.

त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले असले तरी आमदार छगन भुजबळांच्या जाण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसू शकतो. याशिवाय छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभवी लोकनेता भाजप किंवा अन्य पक्षाच्या गळाला लागणे हे राष्ट्रवादी काँग्रेसला यांच्या पक्षासाठी फारसे भूषणावह नसेल. त्यामुळे आता अजित पवार हे नाशिकला जाऊन आमदार छगन भुजबळ यांची समजूत काढतील असे त्यांनी सांगितले जात आहे.

हेही वाचा :

मोठी बातमी! शरद पवारांनी घेतली PM मोदींची भेट

हवेत उडणाऱ्या ड्रोनला मगरीने टाकले गिळून, पुढे जे झाले…Video 

आर अश्विनचा मोठा निर्णय; क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित