भाजप एकनाथ शिंदेंचा गेम करणार?; शिंदेंना बसू शकतो मोठा धक्का

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास(politics) आघाडीसह महायुती देखील जोरदार तयारी करत आहे. यावेळी विधानसभेला भाजप पक्षाने सर्वाधिक जागा लढवण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना अजित पवार गटाला कमी जागांवर लढावं लागणार आहे. त्यामुळे आता विधानसभेत देखील महायुतीमध्ये भाजपचं मोठा भाऊ असल्याचं दिसत आहे.

मात्र यंदाच्या विधानसभेत मुख्यमंत्री(politics)एकनाथ शिंदेंना भाजप पुन्हा एकदा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं समजत आहे. याशिवाय जर महायुतीची सत्ता आली तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदाला मुकावं लागणार असल्याचं समजत आहे. कारण महायुतीमध्ये ज्या पक्षाच्या सर्वात जास्त जागा येणार तो पक्षाचा मुख्यमंत्री होणार असं भाजप पक्षाने ठरवल असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र महायुतीच्या या फॉर्मुल्याचा फायदा भाजप पक्षालाच होणार असल्याचं समजत आहे. कारण लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता महायुतीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा भाजपपेक्षा चांगला होता. त्यामुळे यंदाच्या विधानसभेत देखील पुन्हा शिंदेना मुख्यमंत्रीपदासाठी कौल मिळण्याची शक्यता जास्त आहे. दरम्यान आता अमित शाह यांनी शिंदेंना त्यांच्या त्यागाची आठवण करुन दिली आहे.

दरम्यान, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना 124 जागांवर लढली होती. परंतू यंदाच्या वर्षी म्हणजेच 2024 ला बाळासाहेबांची शिवसेना म्हणणाऱ्या भाजपने शिंदेंना केवळ 80 जागा दिल्या आहेत. कारण लोकसभा निवडणुकीत 28 जागा लढवून अवघ्या 9 जागा जिंकणाऱ्या भाजप पक्षाने यंदा विधानसभेला थेट 160 पेक्षा अधिक जागा लढवण्याची तयारी सुरु केली आहे.

त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी कमी जागा लढवून देखील भाजपपेक्षा अधिक जागा मिळवणं हे खरं आव्हान एकनाथ शिंदेंसमोर असणार आहे. तसेच महायुतीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार? हे अद्याप घोषित केलेलं नाही. त्यामुळे विधानसभा निकालानंतर जर भाजपला जास्त जागा मिळाल्या तर भाजप पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या सूत्राची आठवण करून देणार हे मात्र निश्चित आहे. मात्र त्यावेळी शिंदेंना या गोष्टींचा धक्का बसू शकतो.

हेही वाचा :

चक्र बदलणार! देशात जनगणना कधी होऊ शकते?

अखेर काँग्रेसच्या पंचांगात “लाटकर” मुहूर्त निघाला, पण..!

हृतिकच्या एक्स वाईफचं बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक, मुलांसमोर पार्टनरला KISS Video