विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला(political issue) प्रचंड बहुमत मिळाल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झालं आहे. अशातच 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र सरकार स्थापन झालं असलं तरी देखील अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे नवीन डाव टाकणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 14 डिसेंबर 2024 ला मंत्रीमंडळ(political issue) विस्तार केला जाणार असल्यासाची माहिती समोर आली आहे. कारण यासंदर्भात काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली आहे. या बैठकी दरम्यान मंत्रिमंडळ खात्याच्या जागा वाटपावरून चर्चा करण्यात आली.
त्यानंतर आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत एक अंतिम बैठक होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी मंत्रिमंडळ विस्तारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून दोन मंत्र्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर 5 नवीन आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे.
अशातच शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहे. यामध्ये माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट केला जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर गेल्या मंत्रिमंडळात गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, शंभुराज देसाई, तानाजी सावंत, उदय सामंत, दादा भुसे यांच्याकडे मंत्रीपदे देण्यात आली होती. मात्र यावेळी भरत गोगावले, प्रताप सरनाईक, संजय शिरसाट, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे या पाच जणांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या या पाच नवीन चेहऱ्यांपैकी भरत गोगावले हे कोकणातले आहेत. त्यामुळे शिवसेना कोकणात वाढवण्यासाठी भरत गोगावले यांना मंत्रिपदाची संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर संजय शिरसाट, अर्जुन खोतकर हे दोन्ही आमदार मराठवाड्यातील नेते आहेत. त्यामुळे मराठवाड्यात पक्षविस्तारासाठी त्यांची मदत होणार आहे. याशिवाय प्रताप सरनाईक हे ठाणे, तर विजय शिवतारे हे पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आहेत. या दोघांचा जिल्ह्यात पक्ष विस्तारासाठी मोठा फायदा होईल यासाठी त्यांना मंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
तिसऱ्या कसोटीआधी संघाला मोठा धक्का! स्टार सलामीवीर अचानक बाहेर
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलमध्ये मोठी घसरण
अटक होईल, या भीतीने शिंदे कधीही बेळगावला गेले नाहीत, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना टोला