मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी लढणार;

पॅरिस ऑलिंपिकच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या(Paris) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय पुरुष हॉकी संघाला सपाटून मार खावा लागला.

पर्थ : पॅरिस ऑलिंपिकच्या दृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत भारतीय पुरुष हॉकी संघाला सपाटून मार खावा लागला. आता दोन देशांमधील तिसरा सामना उद्या (Paris) होणार असून सलग तिसरा पराभव टाळण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार असून त्यामुळे मालिकेतील आव्हानही कायम राहणार आहे.

यजमान ऑस्ट्रेलियन संघ विजयी मालिका कायम ठेवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करताना दिसेल. यजमान ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या लढतीत भारतीय संघाचा ५-१ असा धुव्वा उडवला. त्यानंतर दुसऱ्या लढतीत भारतीय संघाचे आव्हान ४-२ असे संपुष्टात आणले. पहिल्या दोन लढतींत भारतीय संघाकडून निराशाजनक कामगिरी झाली.

मुख्य प्रशिक्षक क्रेग फुल्टन याप्रसंगी म्हणाले की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका भारतीय संघाच्या कामगिरीत सुधारणा आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकते. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून या मालिकेत भारतीय संघ कमकुवत बाजूंवर विशेष लक्ष देईल, असे प्रकर्षाने दिसून येत आहे.

कर्णधार हरमनप्रीत सिंग स्वत: बचावफळीत खेळत असून पहिल्या दोन्ही लढतींत भारतीय संघ या विभागात ढिसाळ कामगिरी करताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियन हॉकीपटूंना पेनल्टी कॉर्नरवर तसेच फिल्डमध्ये सहज गोल करता येत आहेत.

एवढेच नव्हे तर भारतीय हॉकीपटूंना आक्रमक फळीतही अपयशाला सामोरे जावे लागत आहे. मनदीप सिंग, अभिषेक, ललितकुमार उपाध्याय, गुर्जंत सिंग व सुखजीत यांना मिळालेल्या संधीचा फायदा घेता यायला हवा. पहिल्या दोन लढतींत त्यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आलेले नाही. भारतीय हॉकीपटूंनी मधल्या फळीत समाधानकारक कामगिरी केलेली आहे.

हेही वाचा :

नेत्यांच्या कोलांट्या उड्या आणि नियतीचा सूड……!

मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुटी न दिल्यास होणार कारवाई

मोदींच्या मनासारखं झालं नाही तर ते सत्तेचा गैरवापर करतात; शरद पवारांची टीका