लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दाव्याचं खंडन करताना संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी सोमवारी जाहीर केलं की, लष्करी (army) सेवेत असताना मृत्यू झालेल्या अग्निवीराच्या कुटुंबाला 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम नुकसान भरपाई म्हणून दिली जाईल.
“सक्रिय लष्करी सेवेदरम्यान कोणत्याही अग्निवीरचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. यामध्ये 48 लाख रुपयांच्या विम्याचा समावेश आहे ज्यासाठी अग्निवीरकडून कोणतेही पेमेंट घेतले जात नाही. 44 लाख रुपये अनुग्रह सेवा सुमारे 11.70 लाख रुपयांचं निधी पॅकेज आणि सेवा कालावधीसाठी शिल्लक असलेले वेतन याशिवाय, अग्निवीरांसाठी 50 लाख ते 1 कोटी रुपयांचे विमा संरक्षण देखील आहे. ज्यासाठी सरकारने विविध बँकांशी करार केला असून विम्यासाठी अग्निवीरांना कोणताही प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही,” असं सूत्रांच्या हवाल्यानं एएनआयनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निवीरांच्या (army) कुटुंबीयांना देण्यात आलेल्या नुकसानभरपाईबाबत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात सोमवारी लोकसभेत जोरदार तोफा डागल्यानंतर काही तासांनंतर संरक्षण खात्यानं हे स्पष्टीकरण दिलं आहे.
“अग्नवीरच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची भरपाई देण्यात आल्याचं संरक्षणमंत्र्यांनी याआधी सांगितले होतं, पण ते चुकीचे होतं. विम्याची रक्कम अग्निवीरच्या कुटुंबाला देण्यात आली. त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं. त्याचबरोबर केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये अग्निवीरांच्या (army) पेन्शनचा समावेश न केल्याबद्दलही राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर टीका केली.
“मोदी सरकारनं लष्कराच्या जवानांना अग्निवीर चक्रव्यूहात अडकवले आहे. अग्निवीरांच्या पेन्शनसाठी बजेटमध्ये एक रुपयाही नाही. तुम्ही स्वतःला देशभक्त म्हणता. पण जेव्हा अग्निवीरांना मदत करण्याचा आणि सैनिकांना पैसे देण्याचा प्रश्न येतो तेव्हा तुमच्या बजेटमध्ये एक रुपयाही दिसत नाही,” असं राहुल गांधी म्हणाले होते.
हेही वाचा :
समित कदम यांच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात उडाली खळबळ
पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्यामुळे होतात ५ आश्चर्यकारक फायदे, एकदा जरूर वाचा
काँग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या घरासमोर शेतकऱ्यांचा ‘घेराव’, कर्जमाफीची मागणी जोरदार