सणासुदीत सोने-चांदी स्वस्त होणार की महागणार?

ऑगस्ट महिना हा सोने व चांदीसाठी(festivel) अत्यंत महत्वाचा ठरला आहे. कारण ऑगस्ट महिन्यात सोनीच्या व चांदीच्या भावामध्ये अनेकवेळा चढउतार पाहायला मिळाले आहेत. अशातच या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात देखी काही प्रमाणात चढउतार दिसले आहेत. अशातच आता सप्टेंबर महिन्यापासून दिवाळीपर्यंत एका पाठोपाठ सण आहेत. या सणावाराच्या काळात सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सणासुदीला(festivel) धातूंचा भाव वधारतो, हे एकप्रकारे बाजाराचं समीकरणच आहे. अशातच आता अमेरिकन फेडरल बँकेने अनेक दिवसानंतर व्याजदरात कपात होण्याचा संकेत दिला आहे. तसेच फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी दिलेल्या संकेतानुसार, व्याजदरात 1 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे परिणामी दोन्ही धातूचा भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. अशातच आज सोने आणि चांदीचा भाव काय आहे हे जाणून घेऊयात?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे फक्त 28 ऑगस्ट रोजीचं सोने महागले होते. या दिवशी सोने 210 रुपयांनी महागले होते. त्यानंतर सोन्यात इतर दिवशी किंचित प्रमाणात घसरण झाली होती. अशातच सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या दिवशी 22 कॅरेट सोने 67,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 73,190 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

याशिवाय चांदीमध्ये 27 ऑगस्ट रोजी तब्बल 600 रुपयांची दरवाढ झाली होती. तर 26 आणि 30 ऑगस्ट रोजी तब्बल 600 रुपयांची घसरण देखील झाली होती. मात्र इतर दिवशी चांदीच्या भावात कोणताच बदल झाला नाही. अशातच आज एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

आजकाल नागिरकांना सोने-चांदीच्या किंमती घरबसल्या देखील जाणून घेता येतील. मात्र करामुळे शहरानुसार किंमतीत काही प्रमाणात तफावत दिसून येते. अशातच इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन हे या धातूंचे भाव जाहीर करत असते.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या व यामध्ये शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येत असतात. त्यासाठी ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

हेही वाचा:

‘या’ राजकीय पक्षाच्या युवा नेत्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल

तु फक्त I Love you म्हण, रिचार्ज फ्री; ऑफर देणाऱ्याला महिलांनी शिकवला चांगलाच धडा

लोकसभा निवडणुकीत मतभेद झालेले संजयकाका पाटील आणि विलासराव जगताप एकाच व्यासपीठावर