सोनं होणार स्वस्त? ५७ हजारांवर येणार भाव, गुंतवणूकदारांना अच्छे दिन?

देशात सध्या सोन्याचे दर गगनाला भिडले असताना, गुंतवणूकदारांसाठी(investors) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वित्तीय सेवा संस्था ‘मॉर्निंगस्टार’ चे विश्लेषक जॉन मिल्स यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील काही वर्षांत सोन्याच्या किमतीत तब्बल ३८ टक्क्यांपर्यंत घसरण होऊ शकते. यामुळे सोनं ५७ हजार प्रति तोळ्यापर्यंत स्वस्त होण्याची शक्यता आहे.

सध्या सोन्याचे दर प्रति तोळा ९२ हजार रुपयांच्या आसपास आहेत. यामुळे जे गुंतवणूकदार(investors) किंमती कमी होण्याची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी ही संधी सुवर्णमोलाची ठरू शकते.

जॉन मिल्स यांच्या मते, सोन्याच्या दरात घसरण होण्यामागे मागणी व पुरवठ्याचा समतोल बदलणं हे प्रमुख कारण आहे. त्यांनी सांगितलं की, जेव्हा सोनं महाग होतं, तेव्हा खाणकामाचा वेग वाढतो. २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत खाणकामाचा सरासरी नफा प्रति औंस ९५० डॉलर इतका होता – जो २०१२ नंतरचा सर्वाधिक आहे.

त्याचबरोबर, जुन्या सोन्याचा पुनर्वापर आणि विविध देशांनी सोन्याच्या उत्पादनात वाढ केल्यामुळे बाजारात पुरवठा झपाट्याने वाढत आहे. यामुळे किमतीवर दबाव निर्माण होईल आणि दर खाली येतील, असा विश्लेषकांचा निष्कर्ष आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ३१३२ डॉलर प्रति औंस पर्यंत गेले आहेत. मात्र, मॉर्निंगस्टारच्या विश्लेषणानुसार हे दर भविष्यात १८२० डॉलर प्रति औंस पर्यंत घसरण्याची शक्यता आहे. ही घट लक्षात घेता, गुंतवणुकीसाठी योग्य वेळ लवकरच येऊ शकतो.

सध्याच्या परिस्थितीत ज्यांनी आधीच सोन्यात गुंतवणूक केली आहे, त्यांच्यासाठी ही आनंदाची वेळ असली तरी, नवीन गुंतवणूकदारांसाठी हे ‘वेट अँड वॉच’ धोरण महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा :

विधेयक संसदेत मंजूर बाहेरच जास्त चर्चा….!

उद्योजकांना अनुदान मिळवून देण्यासाठी उद्योगमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक; आ. राहुल आवाडे यांच्या पुढाकाराने उद्योजकांना दिलासा

इचलकरंजीतील रस्त्यांची दयनीय अवस्था, भाजप पदाधिकाऱ्यांकडून तक्रार