भारतीय पुरुष क्रिकेट (cricket)निवड समिती आज (ता. ३०) बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना अहमदाबादमध्ये भेटणार आहे.
या बैठकीत वेस्ट इंडीज व अमेरिका येथे होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकासाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. संघ निवड झाल्यानंतर याबाबतची घोषणा बुधवारीही करण्यात येऊ शकते.(cricket)
निवड समितीच्या बैठकीत दोन मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत. आयपीएलमध्ये सुमार खेळ करीत असलेल्या हार्दिक पंड्याचे भारतीय संघातील स्थान व दुसरा यष्टिरक्षण कोण असणार, या दोन बाबींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येण्याची शक्यता आहे.
संजू सॅमसन यंदाच्या आयपीएल मोसमात राजस्थानचा कर्णधार व फलंदाज अशा दुहेरी भूमिकेत छान कामगिरी करीत आहे. के. एल. राहुलपेक्षा त्यांचा फलंदाजी स्ट्राईक रेटही चांगला आहे, पण फक्त एका मोसमातील सातत्यपूर्ण खेळाच्या जोरावर त्याला भारतीय संघात स्थान देण्यात येईल का, हा प्रश्नही याप्रसंगी निर्माण झाला आहे. रिषभ पंतसह कोणता यष्टिरक्षक टी-२० विश्वकरंडकाचे तिकीट मिळवणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
याशिवाय जितेश शर्मा, ध्रुव जुरेल या यष्टिरक्षक फलंदाजांचाही पर्याय असणार आहे. मधल्या फळीत तिलक वर्माला संधी मिळतेय का, हे पाहणे रंजक ठरेल. तो पार्टटाईम फिरकी गोलंदाजीही करतो. तसेच मध्यमगती वेगवान गोलंदाज संदीप शर्मा याच्या नावावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
मोदी, ठाकरे, पवारांनंतर मनोज जरांगेही…
कार्यकर्त्यांनो दोन्ही सभेत दिसू नका, कुणा एकाचं कुंकू लावा : अजित पवार
आरक्षण न मिळाल्यास विधानसभेच्या आखाड्यात उतरणार : मनोज जरांगे