“2100 रुपयांचा हप्ता मिळणार का? महायुती नेत्याचा 15 लाखांचा उल्लेख चर्चेत”

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणाऱ्या लाभात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. आता ही निवडणूक महायुतीने जिंकली असून 5 डिसेंबर रोजी महायुती(Political) सरकार स्थापन होणार आहे. सरकार स्थापन केल्यानंतर महायुती सरकार लडकी बहीण योजनेच्या लाभात वाढ करणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. असे असताना आता नवी माहिती समोर येत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभात सध्यातरी वाढ होण्याची शक्यता धुसर असल्याचं म्हटलं जात आहे.

‘लोकसत्ता’ या मराठी दैनिकाने याबाबतचे वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार लाडकी लाडकी बहीण(Political) योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दरमहा दिला जाणारा निधी सध्याच वाढण्याची शक्यता नाही. या निधीत वाढ करायची असेल तर त्यासाठी मोठ्या अर्थसंकल्पीय तरतुदीची गरज आहे. त्यासाठी सध्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या हफ्यात सध्याच वाढ होण्याची शक्यता नसल्याचं म्हटलं जातंय.

महायुतीने काय आश्वासन दिलं होतं?
विधानसभा निवडणुकीदरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारा 1500 रुपये प्रतिमहिना लाभ वाढवून 2100 रुपये केला जाईल, असे आश्वासन दिले होते. विशेष म्हणजे अनेक जाहीर सभांतून हे आश्वासन अनेकदा करण्यात आले होते. महायुतीच्या घटकपक्षांच्या जाहीरनाम्यातही ही बाब नमूद होती. नव्याने सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक लोकप्रिय निर्णय घेतले जातात. आज महायुती सरकारची स्थापना होणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन झाले की पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत सरकार लाडकी बहीण योजनेच्या लाभवाढीची घोषणा करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. असे असतानाच मात्र ही लाभवाढ करण्याआधी आर्थिक स्थितीचा आढावा घेणे गरजेचे असल्याचे राज्याच्या प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या वाढीव हफ्त्यावर महायुतीच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. लोकांना 15 लाख रुपयांचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण झाले का? तरीही लोकांनी भाजपालाच मते दिली. त्यामुळे या योजनेतील निधी वाढवला नाही म्हणून कोणी नाराज होणार नाही, असा दावा या ज्येष्ठ नेत्याने केला आहे. त्यामुळे आगामी काळात लाडक्या बहिणींना वाढीव हफ्ता मिळणार का? ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

‘या’ 3 राशींवर बरसणार शनीची कृपा; छू मंतर होतील सर्व अडचणी

पत्नीची हत्या, नंतर पतीने Google वर सर्च केलं, “बायकोच्या मृत्यूनंतर किती दिवसात पुन्हा लग्न करता येईल?”

निम्म्या राज्यावर वादळी पावसाचं सावट; थंडीचं पुनरागमन कधी?