इचलकरंजी ; इचलकरंजी शहराला २ ते ३ दिवसाआड पाणी(water) मिळत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहराच्या पाणीटंचाईवर तोडगा म्हणून सुळकुड (ता. कागल) येथून पाणी आणण्याची १६० कोटींची योजना मंजूर झाली आहे, मात्र काही गावांच्या विरोधामुळे अंमलबजावणी रखडली आहे.

योजनेला(water) गती देण्यासाठी इचलकरंजी नागरिक मंचने खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन ठोस भूमिका घेण्याची मागणी केली होती. तसेच पत्रकार परिषद घेत भूमिकाही मांडली होती ,या मागणीच्या पार्श्वभूमीवर खा. माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने बैठक घेण्याची विनंती केली आहे.
या बैठकीत संबंधित मंत्री, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहून मार्ग काढावा,अशी मागणी त्यांनी केली आहे. इचलकरंजी नागरिक मंचनेही योजनेच्या त्वरित अंमलबजावणीची गरज असल्याचे स्पष्ट केले असून, बैठक झाल्यास सकारात्मक निर्णय होईल व इचलकरंजी शहराचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा :
ऐन उन्हाळ्यात पावसाचा देण्यात आला इशारा; राज्यात पुढील तीन दिवस…
यड्राव : शिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; संतापाची लाट
विराटच्या टीकेनंतर ‘फॅमिली रुल्स’बद्दल आले मोठे अपडेट, BCCI ने टीम इंडियाला दिला धक्का!