लाडकी बहीण योजनेबद्दलची ती पोस्ट करणं संजय राऊतांना भोवणार? पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई: राज्यात सर्वत्र सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे. या योजनेवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर अनेकदा टीका करताना दिसतात, मात्र या योजनेबाबत केलेल्या एका पोस्टमुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत(political news) यांच्या अडचणी वाढण्याची चित्र दिसत आहेत. लाडकी बहीण योजनेबद्दल खोटी माहिती पसरवल्याबाबतची तक्रार संजय राऊतांविरोधात करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खोटी अफवा पसरवल्याबद्दल संजय राऊत यांच्याविरोधात(political news) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना बंद पडल्याचा खोटा दावा राऊतांनी केला होता. याप्रकरणी भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या तक्रारीनंतर संजय राऊत विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मध्य प्रदेशातील भोपाळ शहरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सजंय राऊत यांनी ‘लाडकी बहीण’ योजना बंद पडल्याची खोटी अफवा पसरवली होती, ज्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील लाडकी बहीण योजना ही महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

भोपाळमध्ये भाजप महिला मोर्चाच्या नेत्या सुभाषा चौहान यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत राऊत यांनी समाजात खोटी माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे जनतेमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

चार दिवसांपूर्वी म्हणजे 7 आक्टोबरला सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रदेशातील लाडकी बहिण योजना बंद पडली आहे, महाराष्ट्रातील योजना बंद पडेल असा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरं तर मध्य प्रदेशमध्ये गेल्या दोन वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरू आहे.

भाजप नेते पुढे म्हणाले की, राज्यातील भाजप सरकारकडून लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1250 रुपये दिले जात आहेत. भाजप सरकार भगिनींच्या सक्षमीकरणासाठी काम करत आहे. त्यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी भाजप सरकार महिलांच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे.

या प्रकरणाबाबत भोपाळ येथील क्राइम ब्रँचचे अतिरिक्त डीसीपी शैलेंद्र सिंह चौहान म्हणाले की, आम्हाला काही लोकांकडून तक्रारी आल्या होत्या की, काही नेते सरकारच्या धोरणांबद्दल चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन आम्ही बीएनएस कलम 353(2), 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा:

एकनाथ शिंदें यांना मोठा धक्का; विजय नाहटा तुतारी फुंकणार

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी वरदान! होतील ‘या’ समस्या दूर

गुलीगत सूरज चव्हाणच्या ‘राजा राणी’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच