राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी महायुतीचा पराभव होणार असल्याचं सांगत आहे. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या(Yojana) जोरावर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे.

यातच सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजना(Yojana) बंद पडली असल्याची चर्चा सुरु आहे मात्र आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर टीका करत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याची माहिती दिली आहे. त्यांनी एका एका व्हिडिओ मेसेजमध्ये लाडकी बहीण योजनेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल राज्यातील महिलांचे आभार मानले आहे.
या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणाले की, लाडकी बहीण योजनेने महिलांना स्वावलंबी बनवून सक्षम केले. या योजनेमुळे लाडक्या बहिणींना स्वत:च्या पायावर खंबीरपणे उभे राहण्यास मदत झाली आहे असं या व्हिडिओमध्ये अजित पवार म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीत महिलांनी महायुतीला पाठिंबा द्यावे असे आवाहन देखील अजित पवार यांनी व्हिडिओ मेसेजमध्ये म्हटले आहे.
तर दुसरीकडे पुढे बोलताना अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधत म्हणाले की, विरोधक म्हणत आहे की आता या योजनेचे पैसे येत आहे मात्र निवडणुकीनंतर ही योजना बंद होणार आहे असं ते म्हणत आहे. पण महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी, छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी या पैशांचा वापर केला आहे. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण 7500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे असं ते म्हणाले.
या योजनेसाठी आम्ही 46 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. आम्ही दर महिन्याला महिलांना 1500 रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद केल्याचा दावा केला आहे मात्र तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो मी ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच निवडणुकीनंतर सरकार या योजनेच्या निधीमध्ये वाढ करणार असल्याचे देखील त्यांनी संगितले.
हेही वाचा:
रोहित शर्मा IPL मध्ये कोणत्या टीमकडून खेळणार?
एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराला निवडणूक आयोगाचा झटका?
‘सिंघम अगेन’मधील पहिल्या गाण्याने यूट्यूबवर उडवली खळबळ!