महिला सशक्तीकरण आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी केंद्र (discontinued)सरकारने सुरू केलेली महिला सम्मान सेविंग्स सर्टिफिकेट योजना 31 मार्च 2025 नंतर बंद होण्याची शक्यता आहे. ही योजना महिलांसाठी आकर्षक पर्याय असून 7.5% वार्षिक व्याजदरासह दोन वर्षांची मुदत ठेव योजना आहे. मात्र, या योजनेत गुंतवणुकीचा कालावधी वाढवण्याबाबत सरकारने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे इच्छुक महिलांनी 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.

महिला सम्मान सेविंग्स सर्टिफिकेट म्हणजे काय? :
ही योजना महिलांसाठी स्थिर आणि सुरक्षित बचतीचा पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूकदार महिलांना मुदतपूर्तीनंतर मूलभूत रक्कम व्याजासह मिळते. ठेवीवर प्रत्येक तीन महिन्यांनी व्याज जमा होऊन मुदतीच्या शेवटी संपूर्ण रक्कम परत मिळते. अल्प बचतीतून मोठा परतावा मिळवण्यासाठी ही योजना(discontinued) उपयुक्त ठरते.
या योजनेत प्रत्येक महिला आणि मुली सहभागी होऊ शकतात. तसेच, अल्पवयीन मुलीसाठी तिचे पालक किंवा कायदेशीर संरक्षक खाते उघडू शकतात. अर्ज करण्यासाठी नजीकच्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरावा लागतो.
महिला किमान ₹1,000 आणि जास्तीत जास्त ₹2 लाख गुंतवू शकतात. गुंतवलेल्या रकमेपैकी 40% रक्कम एक वर्षानंतर काढता येते, तर संपूर्ण रक्कम दोन वर्षांनी मिळते. (discontinued)यामुळे महिलांना लवचिक आणि सुरक्षित आर्थिक संधी मिळते.
31 मार्च 2025 नंतर या योजनेत गुंतवणुकीची संधी बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर निर्णय घेऊन बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खाते उघडणे फायद्याचे ठरेल. या योजनेत सुरक्षितता आणि हमीदार परतावा असल्याने ती एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. गुंतवणूकदारांनी वेळ न दवडता 31 मार्चपूर्वी अर्ज करावा.
हेही वाचा :
तरुणाची निर्घृण हत्या; शरीराचे तुकडे वेगवेगळ्या विहिरीत सापडले
बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!
सूरज चव्हाणच्या ‘झापूक झुपूक’ची पहिली झलक; ‘एका बुक्कीत टेंगुळ’ डायलॉगने घातला धुमाकूळ!