मुंबई : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा(political articles) पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा उद्या (रविवारी) नागपुरातील राजभवनात होणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते पक्षश्रेष्ठींच्या गाठी-भेटी घेताना दिसत आहेत. मुंबईतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज सकाळपासून अनेक नेते गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
महाराष्ट्र विधानसभेच हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून सुरु होतंय. त्याआधी म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे. 15 डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात संध्याकाळी 4 वाजता मंत्री मंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या शपथविधीआधीच इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीगाठी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपसह(political articles) एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरा 1.30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेंची देखील भेट घेतली.
मंत्रिपद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सांगर बंगल्यावर दाखल झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर सातारा येथील शिवेंद्रराजे भोसले, कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार प्रकाश सोळंके, भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिंदे गटाचे संजय शिरसाठ, माजी मंत्री संजय राठोड, आमदार कुमार आयलानी, मनसे नेते राजू पाटील, आमदार संतोष दानवे, आमदार नमिता मुंदडा यांनी धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा पूर्ण निकाल पाहिले तर महायुतीला मोठं यश मिळाले आहे. महाराष्ट्र निकालाचा अंतिम आकडा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. महाराष्ट्रात 288 पैकी 132 जागांवर भाजपला यश आलं आहे. त्यापाठोपाठ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळालं आहे. शिंदे गटाला 57 जागांवर यश मिळालं आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांवर यश मिळालं आहे. यावरुन आता काँग्रेस अॅक्शन मोडवर आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ 46 जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक 20, काँग्रेसला 16 आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. या निवडणुकीत समाजवादी पक्षाला 2 आणि अपक्षांना 10 ठिकाणी यश आलेलं आहे. पण मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांना खातंदेखील उघडता आलेलं नाही.
हेही वाचा :
ऑलिम्पिक मेडलिस्ट पीव्ही सिंधू अडकणार लग्नबंधनात; इन्स्टावर एंग्जेमेंन्टचे फोटो
“लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार? जाणून घ्या सहाव्या हफ्त्याचे अपडेट्स”
एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात घेऊ नका; फडणवीसांकडे ‘या’ नेत्याने केली मागणी