राज्यामध्ये विधानसभा (Assembly)निवडणुकीनंतर जोरदार राजकारण तापले आहे. महायुती व महाविकास आघाडीमधील अनेक नेते नाराज आहेत. यंदाची निवडणूक ही प्रतिष्ठेची होईल अशी अपेक्षा होती.

मात्र प्रत्यक्षात एकतर्फी निकाल लागल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दारूण पराभव झाल्यामुळे महाविकास आघाडीचे नाराज आहेत. तर मंत्रीमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते नाराज आहेत. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या नाराज नेत्याने यापुढे(Assembly) विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.
विधानसभा निवडणूकीमध्ये शिंदे गटाचे अनेक आमदार चांगल्या मताधिक्याने निवडून आले आहे. मात्र महायुती या दुसऱ्यांदा तयार झालेल्या सरकारमध्ये आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक शिंदे गटाच्या नेत्यांना मंत्रिपद देण्यात आलेले नाही. यामध्ये अब्दुल सत्तार, तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना पुन्हा एकदा देण्यात आलेली नाही. यावरुन आता अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर केले आहे.
माध्यमांशी संवाद साधून शिवसेना शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘मी आमदार-मंत्री असताना १८-१८ तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला, मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली व माझा विजय 2420 मतांनी झाला.
लोकांना विकास नकोय, जाती पातीवर निवडणुका होत असतील तर आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील. मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही,’ अशी घोषणा त्यांनी केली आहे.
सत्तार पुढे म्हणाले की, ‘मी मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली, लोकांना विकास नकोय, तर जाती पातीवर निवडणुका हव्यात. आगामी सिल्लोडची नगर परिषद मानी शेवटची निवडणूक राहील, मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही.
कामगारांची नोंदणी करण्यासाठी यंत्रणा राबवली, सिल्लोड सोयगाव मतदार संघाचा विकास केला, सूतगिरणी, मेडिकल कॉलेज, एमआयडिसी आणली. शेतकरी बागायतदार व्हावा, यासाठी पूर्णा नदीवर बेरिजेस बांधण्याच्या कामाला मंजूरी दिली, असे मत अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

पुढे ते म्हणाले की, “आमदार व मंत्री असतांना कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पण, विरोधक काहीच कामे न करता, त्यांना माझ्याबरोबरीने मतदान मिळते. विरोधक जाती पातीवर निवडणूक लढवतात, हे राजकारण घातक आहे.
जर विकासाला प्राधान्य मिळत नसेल व केवळ जाती पातीवर निवडणुका होत असेल, तर लोकांनी मला आतापर्यंत निवडून दिले त्यांचे आभार, पण मी आता यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही. मी माझा मुलगा, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर याला सांगितले की, मी निवडणूक लढणार नाही, तुला लढायची असेल, तर बध नाहीतर जय हिंद जय महाराष्ट्र,” अशी घोषणा अब्दुल सत्तारांनी केली. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा :
Video : हत्तीसमोर तरुणाची ताकद, पुढे तरुणाचं काय झालं हे पाहा,? तुम्हालाही होईल धक्का!
धनुषचा अनोखा अंदाज: चाहत्यांना ‘पोंगल’च्या शुभेच्छा आणि आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!
इंजिनिअर पती पत्नीसमोरच ठेवायचा प्रेयसीसोबत लैंगिक संबंध, दोघींनी मिळून केली हत्या अन् जाळला मृतदेह