मुंबई – मराठी अभिनेत्री(actress)प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या सिनेमात प्राजक्तासोबत स्वप्नील जोशी, प्रार्थना बेहेरे, प्रथमेश शिवलकर, रोहित माने, वनिता खरात यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत. हा सिनेमा २८ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्राजक्ता अनेक माध्यमांना मुलाखत देत आहे. अशातच आता प्राजक्ताने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलंय.

‘सुमन म्युझिक मराठी’ या युट्यूब चॅनेलवरील ‘आम्ही असं ऐकलंय’ या कार्यक्रमाला प्राजक्ता माळीने हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान अभिनेत्रीने(actress) ती आता लग्नासाठी तयार असल्याचं सांगत तिने आईला मुलं बघण्याची परवानगी दिल्याचं सांगितलं आहे. इतकंच नव्हे तर, तिला दोन मुलांनी पत्राच्या माध्यमातून लग्नाची मागणी घेतली आहे. त्या दोन पत्रांमधील तिला शेतकरी मुलाचं पत्र आवडल्याचं सांगितलं.
प्राजक्ता माळी म्हणाली की, ‘माझ्यासाठी मुलं शोधण्याकरिता अखेर मी आईला आता परवानगी दिली आहे. ही ब्रेकिंग न्यूज आहे. काही दिवसांपूर्वी मी उडतं उडतं असंच कुठेतरी बोलले होते, तर आईला खरंच दोन पत्र आली आहेत. मला ती पत्र इतकी आवडली आहेत. मला असं वाटतंय त्यांना फोन लावावा. कारण त्यातील एका पत्रामध्ये त्यांनी खूप प्रांजळपणे म्हटलेलं आहे की, मी शेतकरी आहे. मला माहिती आहे हे काहीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय. तुमचं क्षेत्र वेगळं आहे. पण मला हे प्रांजळपणे मांडायचं आहे, मी शेतकरी आहे. मी शेतीचं करणार, तुम्हाला आवडणार असेल तर मला तुमच्याशी लग्न करायचं आहे.’
प्राजक्ता पुढे म्हणाली की, ‘मला हे पत्र इतकं आवडलं की म्हटलं, हे किती गोड आहे. त्यामुळे मी आता मुलं बघण्यासाठी मनाई केली नाहीये. आधी मी म्हणायचे, तुम्ही डोकेदुखी नका करू. माझ्या डोक्याला ताप देऊ नका. पण, मी आता प्रवाहप्रमाणे जातेय. तुला वाटतंय असं करायचं, आणच शोधून. मी बघते. पण जेव्हा होईल तेव्हा होईल. होईल तरी उत्तम आणि नाही होईल तरी उत्तम.’
हेही वाचा :
आत्याबाईला मिश्या असत्या तर? जर आणि तर ची भाषा निरोपयोगी
लसूण सोलून फ्रीजमध्ये ठेवणे योग्य की अयोग्य? तज्ञांकडून जाणून घ्या
महिलांना 50 टक्के सवलत दिल्यामुळेच एसटी तोट्यात गेली, परिवहन मंत्र्यांची कबुली
आत्याबाईला मिश्या असत्या तर? जर आणि तर ची भाषा निरोपयोगी