भारत आणि न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात पाऊस अडथळा ठरणार?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची स्पर्धा यंदा चांगलीच रंगली. भारताने ग्रुप स्टेजमधील सगळेच समाने जिंकून आता अंतिम सामनाही(match) जिंकण्याच्या तयारीत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात रविवारी अजिंक्य भारताचा सामना धडाकेबाज संघ न्यूझीलंडशी होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा महान सामना(match) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता खेळवला जाणार आहे. तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आठ संघांच्या या महाकुंभाला नवा विजेता मिळणार आहे. योगायोगाने, 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तानकडून पराभूत झाला होता आणि तिसरे विजेतेपद मिळवण्यापासून वंचित राहिला होता. मात्र आता 12 वर्षांनंतर भारताला पुन्हा एकदा आयसीसीचे हे मोठे विजेतेपद जिंकण्याची संधी आहे. भारताने शेवटचे 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले होते.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात पावसामुळे व्यत्यय येणार की नाही, याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. खरतर, रविवारी होणाऱ्या या अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नाही. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल आणि त्यावेळी तापमान 34 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

जसजसा दिवस पुढे जाईल तसतसे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, दुबईतदुपारी ३ वाजल्यापासून काही ढग दाटून येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी तापमान 28 अंश सेल्सिअस (82.4 अंश फॅरेनहाइट) पर्यंत घसरण्याची अपेक्षा आहे.

जर 9 मार्चला अंतिम सामना पावसामुळे वाहून गेला तर तो राखीव दिवशी होईल. त्याचवेळी पावसामुळे खेळ मध्यंतरी थांबला, तर तो राखीव दिवशी जिथे थांबला होता तिथून सुरू होईल. दरम्यान, राखीव दिवशीही खेळ शक्य नसेल, तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ट्रॉफी सामायिक केली जाईल. 2002 मध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती, जेव्हा संततधार पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि दोन्ही संघांना ट्रॉफी शेअर करावी लागली होती.

हेही वाचा :

काँग्रेसला धक्का! पश्चिम महाराष्ट्रातला बडा नेता राष्ट्रवादीच्या गळाला

विद्यार्थ्यांसमोर महिला शिक्षकांनी एकमेकांना लाठ्यांनी हाणले; मारामारीचा Video Viral

14 मार्चचं चंद्रग्रहण ठरणार गेमचेंजर, ‘या’ 4 राशींना लागणार जॅकपॉट! प्रत्येक कामात यश, नोकरीत प्रमोशन, धनलाभ