रोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची(Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील बॉर्डर-गावसकर मालिकेतील खराब कामगिरी अद्यापही कायम आहे. तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी रोहित शर्मा पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. रोहित शर्माने 27 चेंडूत फक्त 10 धावा केल्या. या सामन्यात पुन्हा एकदा भारतीय फलंदाजी ढेपाळली आहे. दरम्यान रोहित शर्मा बाद झाल्यानंतर त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगली आहे. यामागे त्याने मैदानात एक कृती कारणीभूत ठरली आहे.

रोहित शर्माने(Rohit Sharma) सलग तिसऱ्या डावात सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. दरम्यान रोहित शर्मा मैदानात उभा असताना फार संघर्ष करताना दिसला नाही. चेंडू बॅटवर येण्याची वाट पाहत तो सहजपणे खेळत होता. पण पॅट कमिन्सच्या एका चेंडूवर त्याचा शॉट हुकला आणि विकेटकिपर अॅलेक्सकडे झेल गेला.

बाद झाल्यानंतर नाराज रोहित शर्मा तंबूत परतला. मात्र परतत असताना त्याने आपले ग्लोव्ह्ज डग आऊटमध्ये, जाहिरत बोर्डाच्या मागे ठेवले. रोहितने ग्लोव्ह्ज मैदानात ठेवल्याने अनेक क्रिकेट चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अनेकांनी रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करेल असे अंदाज व्यक्त केले आहेत.

रोहित शर्माने जून महिन्यात टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. तसंच फेब्रुवारी महिन्यात चॅम्पिअन्स ट्रॉफीनंतर रोहित शर्मा एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करु शकतो अशीही शक्यता आहे. भारतीय संघ दुबईत आपले सामने खेळण्याची शक्यता आहे, तर स्पर्धेतील उर्वरित सामने पाकिस्तानात होतील.

रोहितने कॅलेंडर वर्षाची सुरुवात चांगली केली, जिथे त्याने घरच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध दोन शतकं झळकावली. सप्टेंबरमध्ये भारताचे दीर्घ कसोटी कॅलेंडर सुरू झाल्यापासून, त्याने 13 डावांत केवळ 152 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एका अर्धशतकांचा समावेश आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्धच्या घरच्या मालिकेत त्याच्या सर्वात वाईट कामगिरीची नोंद झाली आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन डावात फक्त 19 धावा केल्या. या मालिकेत त्याने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. तर त्याच्या जागी के एल राहुल सलामीवीर म्हणून खेळत आहे.

जर रोहित शर्मा मालिकेतील उर्वरित दोन सामन्यातही चांगली कामगिरी करु शकला नाही तर निवडकर्त्यांना त्याच्याबद्दल वेगळा विचार करावा लागू शकतो.

हेही वाचा :

“मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर होती पण,…”; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट

पुष्पा चित्रपटचा लहान मुलांवरती परिणाम ! बघा पोराने काय केलं…Video Viral

“गौतम गंभीरचा उत्साही नाच, आकाशदीपच्या चौकारावर हेड कोच खुश” Video