कॉमेडियन समय रैना, युट्यूबर पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया आणि(podcaster) ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो.. ही नावं गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कानांवर पडलीच असतील. सोशल मीडियावर या सर्वांची इतकी चर्चा आहे की प्रत्येकाला या शोबद्दल आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल जाणून घ्यायचं आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये स्पर्धक आणि परीक्षकांकडून होणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे हा शो इतका चर्चेत आला आहे. मात्र याच अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे आता शोचा कर्ताधर्ता समय रैना आणि इतर परीक्षकांवर पोलीस चौकशीची वेळ आली आहे. हा वाद इतका वाढलाय की अखेर युट्यूबरील या शोचे सर्व एपिसोड काढून टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत 50 जणांना महाराष्ट्र सायबर विभागाने समन्स बजावला आहे.

त्यात परीक्षक आणि स्पर्धकांचाही समावेश आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो काय आहे, समय रैना कोण आहे, त्यातील रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कोणती कारवाई होऊ शकते, अशा शोजमधील अश्लील भाषेबद्दल कायदा काय म्हणतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेऊयात..14 जून 2024 रोजी कॉमेडियन समय रैनाने त्याचा ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो युट्यूबवर लाँच केला. उद्योजक बलराज सिंह घईसोबत मिळून समय या शोचं सूत्रसंचालन करतो. ‘गरजेचा नसलेला रिॲलिटी शो, ज्यात काहीच पॉईंट नाही, अगदीच आयुष्यासारखा..’ अशीच या शोची टॅगलाइन आहे. या शोमध्ये स्पर्धकांना स्टेजवर त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. कवितावाचन, नाचणं, गाणं, स्टँडअप कॉमेडी.. असं काहीही स्पर्धकांना मंचावर 90 (podcaster)सेकंदांत सादर करायचं असतं.
स्टेजवर परफॉर्म करण्याआधी प्रत्येक स्पर्धकाला स्वत:लाच रेटिंग द्यायला सांगितलं जातं. त्यानंतर परफॉर्मन्स होतो आणि परीक्षक त्या आधारावर त्यांना रेटिंग्स देतात. जर स्पर्धकाने स्वत:ला दिलेली रेटिंग आणि सर्व परीक्षकांची सरासरी रेटिंग ही मिळतीजुळती असली, तर तो स्पर्धक जिंकतो. जिंकलेल्या स्पर्धकाला त्या दिवसाच्या तिकिट विक्रीतून झालेली सर्व कमाई मिळते. परीक्षकांच्या पॅनलमध्ये सहसा कॉमेडियन्स, युट्यूबर्स आणि काही सेलिब्रिटी सहभागी होतात. रॅपर रफ्तार, रिॲलिटी क्वीन राखी सावंत, अभिनेत्री उर्फी जावेद यांसारखे सेलिब्रिटी या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी झाले होते. हे सेलिब्रिटी परीक्षकसुद्धा असेच असतात, जे स्वत:विषयी झालेला कोणताही विनोद खपवून घेऊ शकतील आणि दुसऱ्यांवरही वाटेत ते विनोद वाटेल त्या भाषेत करू शकतील. याला कुठेच सेन्सॉरशिप नाही. त्यामुळे शिव्या-शाप, अश्लील भाषा, दुहेरी अर्थ असलेले संवाद.. हे सर्व सर्रास या शोमध्ये पहायला मिळतं.
या शोमध्ये डार्क ह्युमर नावाचा प्रकारही अनेकदा पहायला मिळतो. एखाद्याच्या आयुष्यातील संवेदनशील किंवा खासगी मुद्द्यावरुनही शोमध्ये खालच्या पातळीचा विनोद केला जातो. आश्चर्याची बाब म्हणजे अशा विनोदाला जेन-झीकडून आताची पिढी भरभरून प्रतिसादही मिळतोय. म्हणूनच ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एकेका एपिसोडला तब्बल 20 ते 40 दशलक्ष व्ह्यूज आहेत. मात्र आता या सर्व व्ह्यूजवर(podcaster) समय रैनाला पाणी सोडावं लागलंय. कारण एफआयआर आणि पोलीस तक्रारींनंतर त्याने या शोचे सर्व एपिसोड युट्यूबवरून डिलिट केले आहेत.

समय रैनाचा जन्म जम्मूमध्ये एका रुढीवादी काश्मिरी पंडितांच्या कुटुंबात झाला. शालेय शिक्षणानंतर त्याने पुण्यातील प्रिंट इंजीनिअरिंग कोर्समध्ये भाग घेतला. मात्र इथे त्याचं काही मन रमलं नाही. हळूहळू त्याने ओपन माईक कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये त्याने आकाश गुप्तासोबत मिळून ‘कॉमिकस्तान’च्या दुसऱ्या सिझनचं विजेतेपद पटकावलं होतं. इथूनच त्याला प्रसिद्धी मिळत गेली.बुद्धिबळप्रेमी असलेल्या समयने कोविड-19 दरम्यान ऑनलाइन बुद्धिबळ गेम्स स्ट्रीम करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याने विश्वनाथन आनंद आणि मॅग्नस कार्लसन यांसारख्या प्रसिद्ध खेळाडूंसोबत कोलॅबरेशन केलं होतं. त्याने ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजनदेखील केलं होतं. पश्चिम बंगाल आणि आसाममधील पूरग्रस्तांसाठी मदत कार्यांसह विविध कारणांसाठी भरीव निधी उभारण्यासाठी त्याने या खेळाचा वापर केला.
सात महिन्यांपूर्वी समयने ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोची सुरुवात केली. तेव्हापासून हा शो त्यातील वादग्रस्त, अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे सतत चर्चेत आला आहे. मात्र युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाच्या एका अश्लील टिप्पणीनंतर या शोवर आणि त्याच्याशी संबंधित व्यक्तींवर कारवाईला सुरुवात झाली आहे. समय रैना आणि त्याच्या शोविरोधात तक्रारी, एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्ससुद्धा बजावले आहेत. मात्र समय सध्या कॅनडा आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. तिथे ‘समय रैना अनफिल्टर्ड’ नावाच्या त्याच्या स्टँडअप कॉमेडीचे शोज आयोजित करण्यात आले आहेत. 9 फेब्रुवारी रोजी त्याने सियाटल याठिकाणी परफॉर्म केलं होतं. तर 16 मार्चपर्यंत परदेशात त्याचे शोज होणार आहेत.
हेही वाचा :
बड्या चित्रपटासाठी मोनालिसाला आली ऑफर, मिळणार ‘एवढ्या’ लाखाचं मानधन
अमूल दूधाच्या किंमतीत घट?, जाणून घ्या नवे दर
पवारांशी आघाडी करताना विचार करायला हवा होता, आता पक्ष…; माजी आमदाराचा ठाकरेंना घरचा आहेर