लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी सुरूवात झाली असून(Minister), यामध्ये एनडी आणि इंडिया आघाडीमध्ये जोरदार चुरस आहे. दोन्ही आघाड्या बहुमताच्या जवळ असून, काही जागा पडल्यास खासदारांची जुळवाजुळव सुरू झाली आहे.
दरम्यान बिहारमध्ये 15-17 जागांवर आघाडीवर असलेल्या मुख्यमंत्री(Minister) नीतीश कुमार यांना शरद पवार यांनी फोन करत इंडिया आघाडीत येण्यासाठी साद घातली आहे.
दरम्यान 543 जागांसाठी सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए 285 जागांवर पुढे आहे. तर इंडिया आघाडी 235 जागांवर पुढे आहे. जर एनडीएच्या जाग आणखी कमी झाल्या तर एनडीए मधील काही पक्षांना सोबत घेत इंडिया आघाडी सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे.
दरम्यान माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना फोन करत इंडिया आघाडीत येण्याची साद घातली आहे. त्याचबरोबर नीतीश इंडिया आघाडीत आले तर त्यांना उपपंतप्रधान पद मिळण्याची शक्यता आहे. अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली आहे.
हेही वाचा :
मोदींची गॅरंटी, मंगळसूत्र, टेम्पो आणि बरंच काही…; यंदाची लोकसभा याच मुद्द्यांवर गाजली!
सांगलीत विशाल पाटील आघाडीवर, निकालाआधीच कार्यर्त्यांनी जल्लोष करत उधळला गुलाल
‘मोदींच्या निरोप समारंभाची तयारी सुरू’, निकालाच्या पहिल्या कलानंतर संजय राऊतांची फटकेबाजी!