शिंदे जाणार? महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा…

शिवसेनेच्या फुटीनंतर राज्यात भाजप आणि शिवसेना(Minister) शिंदे गटाने सत्ता स्थापन केली. तर या भाजप-शिंदेसेनेच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. भाजपच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान, काही काळाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही दोन भाग पडले आणि अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. तर अजित पवार सत्तेत सहभागी होताच एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

या चर्चांना उपमुख्यमंत्री(Minister) देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला होता. “महायुतीतील सर्वांत मोठ्या पक्षाचा नेत्याच्या नात्याने मी सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही. मुख्यमंत्रिपदाबाबत कोणताही बदल होणार नाही.” असं म्हणत त्यांनी शिंदेंच्या सीएम पदाला कोणताही धक्का लागणार नसल्यांचं स्पष्ट केलं होतं.

मात्र नुकत्याच राज्यातील लोकसभेसाठीचं सर्व टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. लोकसभेनंतर आता काही महिन्यात राज्यातील विधानसभा निवडणूक होणार आहे. अशातच आता पुन्हा राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता खरोखरंच शिंदेंच्या जागेवर दुसरं कोणी मुख्यमंत्री बनणार का? या प्रश्नावर शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलं आहे. शिंदेंचं मुख्यमंत्री पद जाण्याचा कोणताही चान्स नसल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं आहे.

आमदार संजय शिरसाट माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मुख्यमंत्री बदलला जाणार, अशी कोणतीही चर्चा सुरु नाहीये, मुख्यमंत्री बदलले जाणार नाहीत. काही लोकांना वावड्या उठवण्याची सवय असते. परंतु, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत, मजबूत आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री बदलण्याचा चान्स नाही. ते जोरात काम करणारे मुख्यमंत्री असून 24 तास काम करणारा मुख्यमंत्री राज्याला लाभला आहे. त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री बदलला जाणार नाही नाही नाही.” असं शिरसाट यांनी ठामपणे सांगितलं.

यावेळी शिरसाट यांना पुण्यातील ‘हिट अँड रन’ प्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. या प्रकरणात अजित पवारांनी पुण्याच्या आयुक्तांना फोन का केला यावरुन वाद सुरु आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले, “अजितदादांनी फोन का केला? त्याने का केला नाही, याने का केला? अशा चर्चांना काहीही अर्थ नाही. या घटनेत दोघांचा जीव गेला आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, याच्याशी सरकार सहमत असून पोलिस त्या दृष्टीने काम करत आहेत.”

हेही वाचा :

तुमचा पार्टनर नात्यात खूश आहे का? तुमच्यावर प्रेम करतो की नाही? हे कसं ओळखाल

इचलकरंजी रिक्षाचालकांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

इचलकरंजीत भरधाव कारचा थरार; पोलिसांचा फिल्मी स्टाईलने पाठलाग…