विधानसभा निवडणुकीसाठी(political isuee) कार्यक्रम घोषित झाल्यानंतर गल्लीपासून दिल्लीपर्यंत बैठकांवरती बैठका सुरू आहेत. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा जोर सुरू आहे. दुसरीकडे जिल्हा पातळीवरती सुद्धा इच्छुकांची मांदियाळी मुंबई आणि दिल्लीकडे डोळे लावून बसले आहेत.
उमेदवारी निश्चित झाली असली, तरी जाहीरपणे सांगण्याचे धाडस अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीकडून सुद्धा झालेलं नाही. सर्वच पक्षांना बंडखोरीचा धोका अटळ असल्याने ज्यांनी तयारी केली आहे त्यांना सुद्धा काळजी घ्यावी लागत आहे.
दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागावाटप(political isuee) सर्वसाधारण कसं असेल याचं चित्र स्पष्ट होऊ लागलं आहे. कोल्हापूरमध्ये शिंदे गटाकडे सर्वाधिक जागा राहण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक जागा राहण्याची शक्यता आहे.
पक्षीय बलाबलाचा विचार केल्यास काँग्रेसकडे कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर, करवीर आणि हातकणंगले मतदारसंघात तसेच विधान परिषदेत सतेज पाटील आणि शिक्षक पदवीधरमधून जयंत आसगावकर असे सहा आमदार आहेत. त्यामुळे या विद्यमान जागा काँग्रेसकडेच राहण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना शिंदे गटाकडून कोल्हापूरमध्ये प्रबळ असून त्यांच्याकडे विद्यमान आमदार असलेले प्रकाश आंबेडकर यांचा मतदारसंघ राधानगरी-भुदरगड, करवीरमधून चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित असेल असं बोललं जात आहे. शिरोळमधून राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी 2019 मध्ये अपक्ष निवडणूक लढवली होती.
मात्र त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांच्या शाहू आघाडीलाच राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे ते त्यांच्याच पक्षाकडून निवडणूक लढवणार की त्यांना शिंदे गटाकडून पाठिंबा दिला जाणार की अन्य कोणता पर्याय स्वीकारला जाणार? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही.
कोल्हापूरमध्ये महायुतीमध्ये अजित पवार यांच्या वाटेला कागल आणि चंदगड हे दोन मतदारसंघ यापूर्वीच निश्चित झाले आहेत. कागलमधून हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर चंदगडमधून सुद्धा राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे इचलकरंजी आणि कोल्हापूर दक्षिण हे दोनच मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर उत्तरवर भाजपकडून(political isuee) दावा करण्यात आला असला, तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणत्याही स्थितीत ही जागा सोडण्यास तयार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. शाहूवाडी आणि हातकणंगले हे दोन मतदारसंघ महायुतीच्या जागावाटपामध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला सुटण्याची चिन्हे आहेत. स्वतः विनय कोरे हे शाहुवाडी पन्हाळा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर हाकणंगलेमधून अशोकराव माने यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सुद्धा कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ कळीचा मुद्दा ठरला आहे. या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाकडून सुद्धा दावा करण्यात आला आहे. मात्र, विद्यमान आमदार काँग्रेसच्या जयश्री जाधव आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ त्यांच्याकडेच राहील अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र उमेदवार मात्र निश्चित झालेला नाही.
कोल्हापूर दक्षिणमधून ऋतुराज पाटील हेच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असतील, तर हातकणंगलेमधून राजू बाबा आवळे असतील. करवीरमधून राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित आहे. काँग्रेसने या मतदारसंघांसह शिरोळवरती सुद्धा दावा केल्याची चर्चा आहे. शिरोळच्या जागेवरती ठाकरे गटाकडून दावा करण्यात आला असून त्या ठिकाणी माजी आमदार उल्हास पाटील इच्छुक आहेत.
महाविकास आघाडीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात(political isuee) काँग्रेस चार, ठाकरे गट तीन आणि शरद पवार गटाकडे तीन जागा असे चित्र असण्याची शक्यता आहे. राधानगरी भुदरगडमध्ये के पी पाटील आणि ए वाय पाटील यांच्यात उमेदवारीमध्ये चुरस असून त्यांना कोणाची उमेदवारी मिळते त्यावर त्यांचा पक्ष निश्चित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जागा वाटपामध्ये एकंदरीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस वरचढ राहण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात महाविकास आघाडीची जबाबदारी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्यावर असणार आहे. खासदार शाहू महाराज यांचेही बळ असेल. लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभेला सहापैकी पाच मतदारसंघात शाहू महाराज यांना आघाडी मिळाली होती. सतेज पाटील काँग्रेसच्या जागावाटपाच्या केंद्रस्थानी असल्याने जिल्ह्यात संख्याबळ कायम ठेवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. तसेच जिल्ह्यात त्यांच्या गटाची ताकद पाहता महाविकास आघाडीच्या अन्य उमेदवारांसाठी सुद्धा त्यांची ताकद महत्वपूर्ण असेल.
हेही वाचा:
बजाज कंपनी दमदार बाईक लाँच करणार…
रेल्वेचा मोठा निर्णय! फक्त ‘इतके’ दिवस आधी रेल्वेचं तिकीट बूक करता येणार
सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?