श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ

राज्याच्या राजकारणात वातावरण (political action committees)तापल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण जनेतेचं तसंच राजकारणातील नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे. नियमानुसार निवडणुकीच्या निकालानंतर पुढच्या 48 तासात नव्या मुख्यमंत्रीची घोषणा करणं गरजेचं आहे.

मात्र, निवडणूकीचा निकाल लागून काही दिवस उलटून गेले तरी अद्याप मुख्यमंत्री(political action committees) कोण असणार हे समोर आलेलं नाहीये. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला असला तरी, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जात आहे. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीये.

शिवसेना शिंदे गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलत असताना श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते इथे येणार नाहीत. या बातम्या खोट्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.

संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणालाही फोन आलेला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.

भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेंना दिल्याची माहिती आहे. या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

‘या’ शेतकऱ्यांना मिळणार 2,000 रुपये; अशाप्रकारे तपासा यादी

मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

ठाकरेंची मशाल पुन्हा पेटणार? ‘या’ मतदारसंघामध्ये होणार फेर मतमोजणी