नाशिक पश्चिम विधानसभा(assembly) मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेतला आहे. बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे.
यानुसार बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. प्रति युनिट 40 हजार आणि 18 टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे. नाशिक पश्चिम विधानसभा(assembly) मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाल्या आहेत.
हेही वाचा :
6 मजली इमारतीला भीषण आग, थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
“अदानी जेलमध्ये असले पाहिजेत, सरकार त्यांना वाचवतंय”,राहुल गांधी यांची मागणी
पुरे झाली चर्चा… भाजपाची CM पदासंदर्भात कठोर भूमिका; शिंदे-पवारांना स्पष्टच सांगितलं