बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यातले वाद मिटणार? चर्चेत बच्चू कडूंचं ‘ते’ विधान

अमरावतीच्या राजकारणात(Bachchu Kadu) बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यामधील वाद सर्वश्रआहे. या दोन्ही नेत्यांकडून सातत्याने टीकाटिप्पणी केली जात असते.

असे असताना आता(Bachchu Kadu) बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ‘मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू, नंतर चहा घेऊ. राणा आणि आमचं कायमचं वैर नाही किंवा खानदानी दुश्मनी नाही’, असे ते म्हणाले.

तसेच याआधी जो प्रकार झाला आहे, तो मनभेदाचा होता. तो आधी चांगला करण्याचा प्रयत्न करू. जिल्ह्याच्या विकासात आम्ही विरोध करत नाही. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही कधी आडव आलो नाही. तसेच अमरावतीला मंत्रिपद कधी मिळणार यावरही बच्चू कडू यांनी भाष्य केले.

ते म्हणाले, ‘अमरावतीला मंत्रिपदाबाबत विषय हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. तेच यावर निर्णय घेतील. राणा यांना कॉल आला, त्यांना पद देणं यात जमीन आसमानचा फरक आहे. फडणवीसांच्या मनात मंत्रिपदापेक्षा काही मोठे देण्याचा विचार असेल. त्यामुळे मंत्रिपद देण्याचं थांबवलं असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

याशिवाय, मतभेद आणि मनभेद यात फरक आहे. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू, नंतर चहा घेऊ. भाजपला सर्व निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएमची कृपा राहणार आहे. ईव्हीएमच्या कृपेशिवाय भाजपकडे आहे तरी काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अमरावतीत माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात संत गाडगेबाबा मैदानापासून वाडा आंदोलन नुकतेच करण्यात आले होते. बच्चू कडू यांच्यासोबत धनगर बांधव, शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग यांच्यासह शेळ्या, मेंढ्या व घोडे ही मोर्चात सहभागी झाले होते.

शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतमालाला योग्य भाव द्या, मेंढपाळ, धनगर बांधवाच्या समस्या सोडवा, दिव्यांगाना सम्मानजनक मानधन द्या, शेतमजूरांना न्याय द्या यासाठी माजी आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक होत हे आंदोलन पुकारले होते. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हे आंदोलन धडकणार होते.

हेही वाचा :

फडणवीस सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण: 16 तासांचा प्रवास आता फक्त 8 तासांत

धनंजय देशमुखांचा आत्मदहनाचा इशारा; राज्य सरकार काय निर्णय घेणार?

पोस्टातील या योजनेत पैसे गुंतवा अन् निश्चिंत राहा, तुमचे पैसे नक्की दुप्पट होणार