महाविकास आघाडी तुटणार? राहुल गांधींच ‘ते’ वक्तव्य ठरणार कारण

नवी दिल्ली: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवनानंर महाविकास आघाडीत(political consultant) काहीही आलबेल नसल्याच्या बातम्या येत आहेत. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी फुटणार अशाही बातम्या येत होत्या. निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची एकही संयुक्त पत्रकार परिषद न झाल्यामुळे या चर्चांना अधिकच जोर आला आहे. त्यातच आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे त्यात अधिकच भर पडणार आहे.

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनात संविधानांवरील चर्चेदम्यान केंद्रसरकारसह वीर सावकरकरही राहुल गांधींच्या निशाण्यावर होते. शिवसेनेचे(political consultant) खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल यांनी सावरकरांची पुन्हा एकदा ‘माफीवीर’ असे वर्णन केले. राहुल म्हणाले की, मी एकदा इंदिरा गांधींना सावरकरांबद्दल प्रश्न विचारला होता तेव्हा त्यांनी मला सांगितले की, सावरकर इंग्रजांशी सामील झाले होते.

राहुल यांनी दिल्लीस्थित लोकसभेत केलेल्या या वक्तव्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सावरकरांना माफीवीर म्हटल्याने काँग्रेस आणि ठाकरे गटातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना आणि काँग्रेसमधीस संबंध आधीच ताणले गेले होते. दोघांमधील युती आधीच एका नाजूक वळणावर आली होती. त्यातच राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडते की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

सावरकरांचा मनुस्मृतीवर विश्वास असेल तर ते राज्यघटनेच्या पूर्णपणे विरोधात आहेत. सावरकरांना संविधानातही भारतीयत्व दिसले नाही. त्यावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी विचारले की, सावरकरांबद्दल इंदिरा गांधींचे काय मत होते? या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, मी एकदा इंदिरा गांधींना हे विचारले होते. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्याच्या आंदोलनात सगळे तुरुंगात गेले, पण सावरकर मात्र तडजोड करणारे निघाले. सावरकर घाबरले आणि त्यांनी इंग्रजांची माफी मागितली.राहुल यांच्या या वक्तव्यावर सभागृहात गदारोळ झाला. मात्र, यावर काँग्रेसचे खासदार खूश दिसत होते.

2022 मध्ये राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली. यावेळी राहुल वीर सावरकरांवर हल्ला करताना दिसले, त्यावर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आक्षेप घेतला होता. संजय राऊत यांनी जाहीरपणे सावरकरांचे हिरो असे वर्णन केले होते. राहुल यांनी पूर्वजांचा मुद्दा उपस्थित करणे टाळावे, असेही आवाहन संजय राऊतांनी केले होते.

त्यावेळी दोघांमधील युती तुटण्याची चर्चा होती, पण अखेर दोघांमध्ये सामंजस्य करार झाला. या करारामुळे राहुल सावरकरांवर काहीही बोलत नव्हते, असे सांगितले जाते. राहुल सावरकरांच्या मुद्द्यावर गेली 2 वर्षे मौन बाळगून होते, मात्र आता महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर ते अचानक बोलू लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीपासून(political consultant) उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. या पराभवासाठी उद्धव यांच्या पक्षाने जाहीरपणे काँग्रेसला जबाबदार धरले होते. काँग्रेसमुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचे पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते अंबादास दानवे यांनी सांगितले.

अनेक जागांवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या उमेदवारांना पाठिंबा दिला नाही, असे शिवसेनेचे (उद्धव) म्हणणे आहे. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेनेचे (उद्धव) उमेदवार रिंगणात होते. ही जागा काँग्रेसचे बलाढ्य नेते सुशील कुमार शिंदे यांचा बालेकिल्ला मानली जाते. येथे मतदानाच्या दिवशी शिंदे यांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला होता.

अशा परिस्थितीत राहुल यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना (यूबीटी) यांच्यातील संबंध अधिक बिघडू नयेत, असे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेनेचे (UBT) डोळे मुंबई महापालिका निवडणुकीकडे लागले आहेत. ठाकरे घराण्याचा हा बालेकिल्ला मानला जातो. येथे हिंदुत्व आणि मराठा हा मोठा मुद्दा आहे. अशा स्थितीत उद्धव यांचा पक्ष या मुद्द्यावर गप्प बसण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा :

महापालिकेच्या निवडणुका कधी होणार? सर्वात महत्त्वाची माहिती समोर

स्पेशल डिश झटक्यात वजन करेल कमी; जान्हवी कपूर करते आहारात समावेश

मनसे महायुतीत सामील होणार? ‘हा’ बडा नेता फडणवीसांच्या भेटीला