सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘पुष्पा 2: द रूल’ या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कारण या चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चित्रपटगृहे हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या अभिनयाला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. अशातच आता हा चित्रपट ओटीटीवर(OTT) प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
‘पुष्पा 2: द रूल’ सिनेमाने अनेक चित्रोताचे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. कारण या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली आहे. आत्तापर्यंत ‘पुष्पा 2’ सिनेमाने जगभरात तब्बल 1100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तसेच आता हा सिनेमा प्रदर्शित होऊन तब्बल 10 दिवस झाले असले तरी देखील चित्रपटगृहात चाहत्यांची प्रचंड गर्दी जमताना दिसत आहे.
अशातच ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट चित्रपटगृहानंतरओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. यांदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. ‘पुष्पा 2’ सिनेमा पुढच्या वर्षी म्हणजे येत्या 9 जानेवारी 2025 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी(OTT) प्लॅटफॉर्मवर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याच समजत आहे. परंतु, यासंदर्भात निर्मात्यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
दरम्यान, कोणताही सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर 40 ते 50 दिवसांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत असतो. तसेच आता सिनेमा कधी ओटीटीवर प्रदर्शित होणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता चाहत्यांना घरबसल्या सिनेमाचा आनंद घेता येणार आहे.
‘पुष्पा 2: द रूल’ या सिनेमाचे दिग्दर्शक सुकुमार आहेत. तर अल्लू अर्जुन या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तसेच या सिनेमातील अभिनेत्याच्या भूमिकेचं आणि सिनेमाच्या कथेचं सर्वच स्तरातून प्रचंड कौतुक देखील होत आहे.
हेही वाचा :
मोठी घडामोड! अजितदादा २४ तासांपासून नॉट रिचेबल
जहाँ नही चैना, वहॉ नही रहना, भुजबळ आणि इतरांची घुसमट
‘तो’ इशारा कळल्याने अनर्थ टळला! बाईकपासून काही फुटांवरुन वाघाने…