विधानसभेला शिवसेना ठाकरे गट भाजपसोबत हातमिळवणी करणार?

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास(political news) आघाडीला दणदणीत यश मिळालं आहे. शिवसेनेला 9 जागा मिळाल्यानं ठाकरे गटात उर्जा आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना पुन्हा भाजपशी हातमिळवणी करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

पण, आगामी विधानसभेत भाजपसोबत(political news) पुन्हा हातमिळवणी करणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी यांनी सोमवारी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात सांगितलं. तसेच, विधानसभेच्या तयारीला लागण्याचे निर्देशही ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुखांची बैठक पार पडली. यावेळी विजयाबरोबर ज्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांच्या पराभवाची कारणे सुद्धा जाणून घेण्यात आली. याशिवाय उद्धव ठाकरेंनी पदवीधर, शिक्षक निवडणुकीच्या तयारीचा आढावाही घेतला.

लोकसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींना महाविकास आघाडीनं एकत्रितपणे लढून रोखले आहे. मोदी आणि भाजपला देशात बहुमत मुक्त करण्यात महाराष्ट्राचे मोठे योगदान आहे. आता येत्या विधासनभेलाही शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष ताकदीनं लढतील आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करतील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

जागावाटपाचा विचार तुम्ही करू नका. ते योग्यवेळी होईल, तुम्ही राज्यात महाविकास आघाडी मजबूत करण्यासाठी काम करा. विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यातील 180 ते 185 जागा जिंकण्याचं महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. ते लक्ष्य डोळ्यापुढे ठेवून कामाला लागा, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी बैठकीत दिल्या.

दरम्यान, उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. संघटनात्मक बांधणी आणि विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी हा दौरा असेल. या दौऱ्यात बंदिस्त हॉलमध्ये बैठका आणि मेळावे होतील. राज्यभर अशा बैठका होणार आहेत. त्याची तयारी सुरू झाली आहे. दौऱ्याच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असं संजय राऊतांनी सांगितलं.

हेही वाचा :

टीम इंडियाच्या पाकिस्तानवरील विजयानंतर BCCI सचिवांचा स्टँडमध्ये जल्लोष, Video Viral

उर्वशी रौतेलानं पाकिस्तानी क्रिकेटरला दिला पाठिंबा? 9 वर्ष लहान नसीम शाहमुळे पुन्हा एकदा चर्चेत

आत्मा हा कायम राहत असतो, भटकती आत्मा तुम्हाला सोडणार नाही; शरद पवारांचा मोदींना इशारा