साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा पहिला भाग(Entertainment news) बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. त्याने मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ हा चित्रपट 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
दरम्यान, अशातच आता साउथ सुपरस्टार(Entertainment news) अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या अल्लू अर्जुनच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. अल्लू अर्जुनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या शूटिंगच्या शेवटच्या क्षणाचा फोटो शेअर केला आहे.
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या शूटिंगचा शेवटचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कॅमेरा ट्रॉली तसेच चित्रपटाची सर्व टीम देखील दिसत आहे. अल्लू अर्जुनने या फोटोसोबत खास कॅप्शन देखील दिलं आहे. ज्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, ‘शेवटच्या दिवशी पुष्पा 2 चित्रपटाचा शेवटचा फोटो. पुष्पाचा 5 वर्षांचा प्रवास पूर्ण झाला. किती प्रवास होता तो’. अल्लू अर्जुनच्या या पोस्टमुळे ‘पुष्पा’ चित्रपटाची कथा दुसऱ्या भागात संपणार असल्याचे दिसत आहे.
अल्लू अर्जुनच्या या पोस्टमुळे चाहते भावूक झाले आहेत. अभिनेत्याच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. काही चाहत्यांनी ‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काही चाहत्यांनी हा चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 200 कोटींची कमाई करेल असं देखील म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वीच ‘पुष्पा 2’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 9 दिवसांमध्ये या चित्रपटाचा ट्रेलर 7 कोटी 91 लाखांहून अधिक जणांनी पाहिला आहे. 5 डिसेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच मोठ्या प्रमाणात कमाई केली आहे. अमेरिकेत या चित्रपटाची अॅडव्हान्स मोठ्या प्रमाणात झाली आहे.
हेही वाचा :
धक्कादायक! विजेच्या तारांवर लटकून तरुणीचा हाय व्होलटेज ड्रामा
महाविकास आघाडीत फूट? स्वबळाचा सूर टिपेला, नेत्यांचा दबाव वाढला; कोणता पक्ष बाहेर पडणार?
‘मला मोदींचा फोन आला होता…’; एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा