महायुतीच्या मंत्रिमंडळ(political news) विस्तारात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आमदार छगन भुजबळ यांचं नाव वगळण्यात आल्याने त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. मात्र भुजबळांच्या या नाराजीनंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीने अद्यापही त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे आता छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
अजित पवार गटाच्या(political news) राष्ट्रवादीत छगन भुजबळ एकटे पडल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ उद्यापर्यंत सर्वात मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज छगन भुजबळ हे मुंबईत येणार असून दोन दिवस ते समर्थकांशी चर्चा करून मोठा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीनंतर एकाही नेत्याने विचारपूस केली नसल्याने आमदार भुजबळ हे अधिकच नाराज झाल्याचं बोललं जात आहे. मात्र आता या कारणामुळेच भुजबळ यांच्या अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ आज आणि उद्या मुंबईमधील ओबीसी नेत्यांची भेट घेणार आहेत.
नाशिकमध्ये समता परिषदेच्या कार्यकर्त्यांशी छगन भुजबळ यांनी संवाद साधला होता. त्यावेळी सर्वच नेत्यांनी त्यांना वेगळा निर्णय घेण्याचा आग्रह देखील धरला होता. मात्र छगन भुजबळ यांनी देखील यावेळी मनातील भावना व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांवर टीका केली होती. त्यांच्या एकाधिकारशाहीवर भुजबळांनी देखील जोरदार शाब्दिक हल्ला चढवला होता.
मात्र आता भुजबळ यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीपासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला तर भुजबळांसमोर तीन पर्याय असल्याचं बोललं जात आहे. यामधील पहिला पर्याय म्हणजे शरद पवार गटात प्रवेश करणं, दुसरा पर्याय म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करणं आणि तिसरा पर्याय म्हणजे ओबीसींचं देशव्यापी संघटन उभं करणं. मात्र आता छगन भुजबळ कोणता पर्याय निवडतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी आक्रमक
महिलांना का आवडतात मॅरिड पुरूष? दुस-याचा नवरा आवडण्याची धक्कादायक कारणं ऐकून हादराल
लाडक्या बहिणींना मिळणार ३००० रुपये; समोर आली मोठी अपडेट