आज, १ मार्च २०२५ पासून, दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पाच (pockets)महत्त्वाच्या बदलांची अंमलबजावणी होत आहे. या बदलांमुळे आर्थिक नियोजन करणे सोपे होईल.

१. म्युच्युअल फंड नामनिर्देशन
भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाने म्युच्युअल फंड आणि डिमॅट खात्यासाठी नामनिर्देशनाच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. १ मार्चपासून, जास्तीत जास्त १० जणांची नावे नॉमिनी म्हणून जोडता येतील.
२. एलपीजी सिलिंडरच्या किमती
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतात. त्यामुळे, कमर्शियल गॅस सिलिंडरच्या नवीन किमती जाहीर होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम(pockets) तुमच्या खर्चावर होऊ शकतो.
३. मुदतठेवींवरील व्याजदर
मार्च महिन्यात बँका मुदतठेवींवरील व्याजदरात बदल करू शकतात. बँका त्यांच्याकडील तरलता आणि गरजेनुसार व्याजदर ठरवतात. याचा परिणाम गुंतवणुकदारांच्या परताव्यावर होऊ शकतो.
४. यूपीआयमध्ये विमा-एएसबी सुविधा
प्रीमियम भरणे सोपे करण्यासाठी यूपीआय प्रणालीमध्ये विमा-एएसबी (pockets)अॅप्लिकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक्ड अमाऊंट ही सुविधा दिली जाईल. याद्वारे तुम्ही प्रीमियमची रक्कम बँक खात्यात ब्लॉक करू शकता.
५. रेल्वे तिकीट बुकिंग नियम
रेल्वेने तिकीट बुकिंग आणि प्रवासाशी संबंधित काही नियम बदलले आहेत. आता वेटिंग लिस्टतिकीटधारकांना स्लीपर किंवा एसी कोचमध्ये प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. या नियमाचे पालन न केल्यास दंड भरावा लागू शकतो.
हेही वाचा :
चॅम्पियन ट्रॉफी सुरु असताना पाकिस्तानात बॉम्बस्फोट
मेट्रो स्टेशनवर खुल्लमखुल्ला रोमान्स जोडप्याचा किस करतानाचा VIDEO व्हायरल
पत्नीने छळ केल्यामुळे TCS मॅनेजरने संपवलं जीवन video viral