उद्धव ठाकरेंची शिवसेना फुटणार? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा धमाका!

वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक नुकतच लोकसभा आणि राज्यसभेत पास झालं. यावेळी चर्चेत राहिले ते शिवसेना ठाकरे(politics) गट काय करणार. मात्र, सुरुवातीला काहीह स्पष्ट न केलेल्या ठाकरे गटाने शेवटच्या क्षणी विधेयकाच्या विरोधात मतदान करत इंडिया आघाडीला साथ दिली. त्यानंतर आता ठाकरे गटात मोठ वादळ येण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केला आहे.

वक्फ बोर्ड विधेयकाला ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याने त्यांचे अनेक खासदार(politics) नाराज झाले आहेत. त्यातील अनेक आमच्या संपर्कात असून काही लोकांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली असल्याचा खळबळजनक दावाच त्यांनी यावेळी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

त्याचबरोबर अशाच आशयाचा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. ते म्हणाले, ठाकरे गटाच्या अनेक खासदारांना वक्फ बोर्ड विधेयकाच्या बाजूने मतदान करायचे होते. मात्र, पक्षाने निर्णय घेतल्याने काही करता आलं नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात खदखद असून ते लवकरच वेगळा निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता ठाकरे गटातील कोण-कोण फुटणार याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा :

बॉलिवूडवर शोककळा! ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन

आदित्य ठाकरेंना दिलासा दिशा सालियान प्रकरणी वडिलांची मोठी कबुली

आजची 4 एप्रिल तारीख नशीब पालटणारी! ‘या’ 5 राशींना झटक्यात श्रीमंत व्हायला वेळ लागणार नाही..