उर्फी जावेद आणि ओरी लग्नबंधनात अडकणार?

सोशल मीडिया स्टार उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. उर्फी जावेद तिच्या हटके फॅशन(married) स्टाईलमुळे ओळखली जाते. उर्फी जावेद अनेकदा वेगवेगळ्या स्टाईलचे ड्रेस परिधान करुन पापाराझींसमोर पोझ देताना दिसते. उर्फी जावेद आता एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. ते म्हणजे उर्फीचे लग्न. उर्फीने पापाराझींसमोर तिला लग्न करायचे असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच उर्फी जावेद पापाराझींसमोर स्पॉट(married) झाली. त्यावेळी तिने तिच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. पापाराझींसमोर तिने म्हटलं की, ‘मी लग्न करायला तरयार आहे,परंतु ओरी हो म्हणत नाही. नाहीतर केलं असतं लग्न’. यावरुन सध्या सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

यानंतर उर्फी आणि ओरी दोघेही एकत्र स्पॉट होतात. त्यावेळी उर्फी ओरीला किस करते. दोघंही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. यानंतर ओरीला त्याच्याबद्दल प्रश्न विचारले जातात. त्याला विचारतात की, तू उर्फीशी लग्न करणार का? त्यावर तो म्हणतो उर्फीशी कोण का लग्न करणार नाही? यानंतर हे दोघेही हसायला लागतात. यानंतर हे दोघेही तिथून निघून जातात.

या दोघेही एकत्र स्पॉट झाल्यानंतर आता त्यांच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ओरी आणि उर्फीची जोडी खूप चांगली दिसेल, असं नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांनी लग्न करावे अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. याआधीही अनेकजा उर्फी आणि ओरी एकत्र स्पॉट झाले आहे. ते दोघे अनेकदा लग्नाबद्दल बोलताना दिसतात. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

हेही वाचा :

कोट्यवधी कर्मचाऱ्यांना EPFO चा धक्का, ही महत्वाची सुविधा बंद

कोल्हापूरात १८ जूनला मोर्चा! तर २७ जूनला……

सांगलीच्या गणेश खिंडीत धोका, संकट येण्याआधी प्रशासनाला जाग येईल का?