गणपती विसर्जनादिवशी वरूणराजा देखील हजेरी लावणार?

पुणे : सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर आपण आहोत. सध्या काही भागात पावसाने(rain) विश्रांती घेतलीय. तर कुठे रिमझिम पाऊस पडतोय. अशात आता येणाऱ्या दिवसात पाऊस कसा असेल? याबाबतचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मंगळवारी (दि.१७) गणेश विसर्जनाच्या दिवशी पावसाची हजेरी राहणार का याबाबतचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाचे पुणे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी X माध्यमावर विसर्जनाला राज्यात काय स्थिती असेल यावर प्रकाश टाकला आहे. यानुसार सिंधुदुर्ग- गोवा व पूर्व विदर्भा काही ठिकाणी हलक्या पावसाची(rain) शक्यता असून मुंबई ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता आहे.

हवामाान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, उद्या म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात अजुनतरी कुठेही अलर्ट देण्यात आला नाही. मात्र, मराठवाडा, विदर्भ खान्देशातील काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी , नांदेड, हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश असून जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातही पावसाची हजेरी राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. सिंधुदुर्ग-गोवा व पूर्व विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता.उर्वरित;मुंबई, ठाण्यासह राज्यातील बहुतांश ठिकाणी कोरड्या ते अतिशय हलक्या सरींची शक्यता असल्याची माहिती के. एस. होसाळीकर यांनी दिली.

पुणे शहरातील पाऊस

जून-जुलै-ऑगस्ट सरासरी : ४७२ मिमी
जून-जुलै-ऑगस्ट प्रत्यक्षात : ८४२ मिमी
प्रत्यक्षातील पावसाची टक्केवारी : १७८ टक्के

पुणे जिल्ह्यातील पाऊस

जून-जुलै-ऑगस्ट सरासरी : ७०५ मिमी
जून-जुलै-ऑगस्ट प्रत्यक्षात : ९१७ मिमी
प्रत्यक्षातील पावसाची टक्केवारी : १३० मिमी

हेही वाचा:

ब्रेस्ट कॅन्सरसोबत लढा देणाऱ्या हिना खानचा नववधूच्या वेशात रॅम्पवॉक

इचलकरंजी गणेश विसर्जनानिमित्त एसटी वाहतूक मार्गात बदल

महायुतीतून आम्हाला मोकळं करा; युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांचं धनंजय महाडिकांना आवाहन