राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्यापही मिळालेला नाही, त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता आहे. सुरुवातीला रामनवमी (6 एप्रिल 2025) रोजी हप्ता जमा होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, पैसे न आल्याने आता लक्ष अक्षय तृतीया(Akshaya Tritiya) (30 एप्रिल 2025) या शुभदिनाकडे लागले आहे.

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळू शकतो हप्ता?
योजनेचा नववा हप्ता मिळाल्यानंतर महिलांना आता एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली तरी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२१०० रुपये कधी मिळणार?
महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर हा हप्ता वाढवला जाईल, असे स्पष्ट केले आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनीही ५ वर्षांच्या कार्यकाळात हा वाढीव हप्ता देण्यात येईल, असे सांगितले आहे.

पैसे जमा झाले की नाही, कसे तपासाल?
▶ एसएमएस – पैसे खात्यात जमा झाल्यास बँकेकडून तुमच्या मोबाइलवर मेसेज येईल.
▶ नेट बँकिंग / मोबाईल बँकिंग – बँकेच्या अॅपवर लॉगिन करून बॅलन्स तपासा.
▶ एटीएम / पासबुक एन्ट्री – जवळच्या एटीएममध्ये जाऊन बॅलन्स चेक करा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करा.
महिलांचे सरकारकडून अपेक्षा वाढल्या
लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना आर्थिक आधार मिळतो आहे. मात्र, हप्त्याच्या अनियमिततेमुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे. सरकारने आता लवकर निर्णय घेत एप्रिलचा हप्ता अक्षय तृतीयेच्या(Akshaya Tritiya) शुभमुहूर्तावर देण्याची घोषणा करावी, अशी महिलांची मागणी आहे.
हेही वाचा :
बॉस आहे की हैवान! टार्गेट पूर्ण न केल्याने पैसे लावले चाटायला; धक्कादायक Video व्हायरल
प्रायव्हेट व्हिडिओ बनवला, शरीरसुखाची मागणी; संतापलेल्या तरुणीने केले असं काही….
सत्ता वर्तुळात रमणाऱ्यांना “शेतकरी” कळलाच नाही!