झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअलच्या स्टॉक्सची निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार? 

रिलायन्स इंडस्ट्रीजची शेअर बाजारातील सूचीबद्ध कंपनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड आणि (Zomato)झोमॅटो या कंपन्यांना नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी 50 मध्ये सहभागी करुन घेण्यात आलं आहे. एनएसईनं दोन्ही कंपन्यांना काही दिवसांपूर्वी फ्यूचर अँड ऑप्शन्स मध्ये ट्रेड करण्यासाठी सहभागी करुन घेतलं आहे. त्यानंतर फेब्रुवारी 2025 महिन्यात निफ्टी इंडेक्सची फेररचना केली जाऊ शकते. त्यावेळी काही स्टॉक्सचा समावेश निफ्टी 50 मध्ये केला जाऊ शकतो, काही स्टॉक्सला निफ्टी 50 मधून बाहेर केलं जाऊ शकतं.

ब्रोकरेज फर्म जेएम फायनान्शिअलच्या नुसार झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअलच्या स्टॉक्सला निफ्टी 50 समाविष्ट केलं जाऊ शकतं. सार्वजनिक क्षेत्रातील कंपी भारत पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेड आणि आयशर मोटर्स कंपन्यांना देखील निफ्टी 50 मध्ये स्थान दिलं जाऊ शकतं. झोमॅटो (Zomato)आणि जिओ फायनान्शिअल या कंपन्यांना निफ्टी 50 मध्ये घेतल्यानं अनुक्रमे या दोन्ही कंपन्यांमध्ये 607 दक्षलक्ष डॉलर्स आणि 372 दशलक्ष डॉलर्सचा इन्फ्लो पाहायला मिळू शकतो. याशिवाय बीपीसीएल आणि आयशर मोटर्समध्ये अनुक्रमे 223 आणि239 दशलक्ष डॉलर्सचा आऊट फ्लो दिसू शकतो.

झोमॅटो आणि जिओ फायनान्शिअल या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या शेअरधारकांना गेल्या काही महिन्यांमध्ये जोरदार परतावा दिला आहे. झोमॅटोच्या शेअरमध्ये गुरुवारी 4.36 टक्के परतावा पाहायला मिळाला. शेअर बाजार बंद झाला तेव्हा झोमॅटोचा शेअर 269.66 रुपयांवर होता. 2024 मध्ये झोमॅटोच्या शेअरनं गुंतवणूकदारांना 118 टक्के परतावा दिला आहे.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमेटड ऑगस्ट 2023 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमधून डी मर्जरनंतर शेअर बाजारत लिस्ट झाली होती. गुरुवारी जिओ फायनान्शिअलच्या शेअरमध्ये 6.33 टक्के तेजी पाहायला मिळाली. बाजार बंद झाला तेव्हा सेअर 318.35 रुपयांवर होता. 2024 मध्ये शेअरनं 37 टक्के परतावा दिला आहे.

शेअर बाजारात घसरणीचं सत्र
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सेन्सेक्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. भारतीय शेअर बाजारातून गेल्या काही दिवसांपासून विदेशी गुंतवणूकदारांनी त्यांच्याकडे असलेल्या समभागांची विक्री करु पैसे काढून घेतले. याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. मंगळवार आणि बुधवार या दोन दिवसांमध्ये गुंतवणूकदारांचे जवळपास 12 लाख कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे शेअर बाजारात येणाऱ्या आयपीओना देखील गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात पाहावं लागेल. काही दिवसांपूर्वी आलेल्या आयपीओला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

हेही वाचा :

पाकिस्तानी चाहत्याकडून मीका सिंगला भेट: 3 कोटींचं घड्याळ, सोनं आणि हिऱ्याची अंगठी

अखेर उद्धव ठाकरेंनी घातली भाजपला साद; ऐन निवडणुकीत मतभेद बाजूला ठेवून एकत्र?

‘स्वप्न पूर्ण होतात’, प्रियंका, दीपिका-आलियानंतर हॉलिवूडमध्ये ही अभिनेत्री करणार डेब्यू