हिवाळा संपला, उष्णतेची लाट येणार; हवामान विभागाचा इशारा

 गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत (automatic weather station)आहेत. सध्या थंडी गायब झाली असून, राज्याच्या अनेक भागांत उकाडा जाणवू लागला आहे. बहुतांश ठिकाणी किमान आणि कमाल तापमान वाढले असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेचा चांगलाच चटका जाणवू लागला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशांच्या वर गेला आहे.

तापमानात वाढ

हवामान विभागाच्या IMD माहितीनुसार, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाने 36 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला (automatic weather station)आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तापमान 18 ते 22 अंश सेल्सिअसवर गेल्याची नोंद झाली आहे.

विविध ठिकाणचे तापमान

शुक्रवारी दि.7 फेब्रुवारी सोलापूर आणि साताऱ्यात किमान तापमान 23 अंश सेल्सिअस होते.
नांदेड आणि लातूरमध्ये 21 अंश तापमानाची नोंद झाली.
पुण्यात शुक्रवारी 18-20 अंश सेल्सिअस तापमान होते.
पुणे CME दापोडी 43.4°C
लोणावळ्यात 38.3°C
तळेगावमध्ये 37.6°C
शिवाजीनगर 34.4°C
सातारा 39.3°C
कराड 39.3°C
सोलापूर 37.1°C
नाशिक 15.6°C
कुलाबा 28.4°C
सांताक्रूझ 34.0°C
लातूर 35.4°C
परभणी 34.8°C
नांदेड 34.0°C
हिंगोली 34.9°C

राज्यात कोरडे व शुष्क वारे वाहत असून आकाश निरभ्र राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकणआणि मराठवाड्यात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा अधिक नोंदवला गेला आहे. पुढील 3 ते 4 दिवस कमाल तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात ही वाढ होईल, (automatic weather station)असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या 5 दिवसात राज्यात किमान व कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिकच असणार आहे. उत्तर महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी येत्या 24 तासात हळूहळू तापमानात वाढ होईल, असे प्रादेशिक हवामान केंद्राने कळवले आहे.

हेही वाचा :

थरारक व्हिडिओ! भरधाव ट्रक डोक्यावरून गेल्यावरही तो जिवंत, कसे घडले हे?

मुलींनी कसे करावे मुलांना प्रपोज? एकापेक्षा एक हटके Ideas

हिरवा वाटाणा अधिक काळासाठी कसा टिकवून ठेवावा?